ग्रामिण रुग्णालयासाठी स्वतंत्र अधिक्षक आसावा मागणीला जोर.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा ग्रामिण रुग्णालयात नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्याने व ना.आदीतीताई तटकरे,खासदार सुनिलजी तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने ग्रामिण रुग्णालयाबरोबरीने तालुक्याची आरोग्य व्यवस्था सुधारत आहे. यातच म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत वैद्यकिय आधिकाऱ्यां ची मनमानी चालली आसल्याची तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यानी पालकमंत्री ना.आदीतीताई तटकरे यांच्याकडे केली आहे.
ग्रामिण रुग्णालयासाठी आवश्यक असणारे अधीक्षक पद शासनाने सुरवाती पासून रिक्त ठेवल्यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापनेवर नियंत्रण कोणाचेही नसते,या मुद्दावर महादेव पाटील यानी पालकमंत्र्यांचे लक्ष केंद्रीत केले आहे.ग्रामिण रुग्णालयात रोज कार्यरत असणारे वैद्यकिय आधिकारी हे कधीच वेळेत हजर नसल्याने ग्रामिण भागातील रूग्ण डाॅक्टर नसल्याने खाजगी सेवेकडे वळतात,रुग्णालयातील ५०% वैद्यकिय आधिकाऱ्यांचे स्वताचे दवाखाने आसल्याने वैद्यकिय आधिकारी बहुतांश रुग्णाना पुढील तपासण्या आपल्या खाजगी दवाखान्यात करा असे सांगतात असेही पाटील यानी तक्रारीत म्हटले आहे. रुग्णसेवेत गरोदर महीलाना स्वतंत्र अशा महीला कक्षात तपासणे बंधनकारक असताना सेवेत उशीरा येणाऱ्या महीला वैद्यकिय आधी काऱ्यानी महीला रुग्णांची स्वतंत्र कक्षात तपासणी न करता सर्वसाधारण 0.P.D. मध्ये तपासणी करून पुढील तपासणीसाठी माझ्या खाजगी दवाखान्यात यावे असा आग्रह धरतात अशी तक्रार केली असून हे शासनाचे आरोग्यसेवा धोरणाचे विरूध्द आसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ग्रामिण रुग्णाल याचे व्यवस्थापने बाबतची तक्रार पाटील यानी तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांचे कडे केली असून त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा शल्यचिकी त्सक यांच्याकडे केली आहे.
"ग्रामिण रुग्णालयासाठी आवश्यक आरोग्य यंत्रणा,कर्मचारी व अन्य सुविधा पुरणाऱ्या पालक मंत्री ना.आदीतीताई तटकरे यांच्या कडे रुग्णालयाचे व्यवस्थापनेसाठी सुध्दा तक्रार करावी लागते हे खेदाचे वाटते असे पाटील यानी वार्तालाप करताना सांगितले."
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांचे कडे निवेदन देताना माजी सभापती पाटील.
वैयकीय अधिकारी कक्षात उपस्थित नसल्याचे छाया चित्रांत दिसत आहे.
Post a Comment