सतत १५ दिवस पाऊस नसल्याने अन्नदाता चिंताग्रस्त : लाक्णी केलेले भात करपले.



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत ११९६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.परंतु आजच्या स्थितीत म्हसळ्यातील अन्नदाता प्रचंड चिंताग्रस्त आसल्याचे चित्र आहे. ह्याला कारण आहे ऋतूचक्रातील बदल व मॉन्सूनचा बेभरवसा.सुरवातीला मान्सूनचे आगमन जोरात आणि आता तब्बल सुमारे१५ दिवस विश्रांती दिवसेंदिवस भातशेतीसाठी नुकसानाचा विषय ठरत आहे.अवकाळी पाऊस, पावसाचा खंड, कमी दिवसाचा पावसाळा, लांबलेला पाऊस यामुळे पीक उत्पादनात घट व गुणवत्ता ढासळत आहे. पर्यांयाने शेतकरी हवालदिल होत चालला आहे.अनियमित पर्जन्यमान शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब बनला आहे.२४ ते२५जून पर्यंत सुमारे २५ ते ३०% पर्जन्यमान झाले.आवणाला पोषक वातावरण मिळाल्याने ते उत्कृष्ट वाढले, परंतु आज हवामानातील उष्णतामान किमान २६अंश सें.ग्रेट कमाल३२अंशसें.ग्रेट झाल्याने, तसेच मागील १५ दिवसात सरासरी ५मि.मि. असा अत्यल्प पाऊस झाल्याने आवण व लावणी केलेले भात करपत आसल्याचे चित्र आहे.

" सकलप-तोंडसुरे खारलँडचे योग्य बांध नसल्याने बहुतांश वेळा उधाण(भरतीचे) खारे पाणी शेतात साचले, त्याच कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले."
बाळकृष्ण लोणशीकर , शेतकरी सकलप

" भात खाचरातील बांध तणमुक्त करावे, म्हणजे लष्करी आळी, निळे भुंगेरे, पाने गुंडाळणारी आळी व अन्य किडीचा प्रार्दुभाव होणार नाही"
सुजल कुसाळकर , कृषी र्यवेक्षक , म्हसळा 

" तालुक्यात ग्रामिण भागात होत असतंरले शहरीकरण, वृक्षतोड इत्यादी गोष्टी स्थानिक पातळीवर पावसाचा पॅटर्न बदलतात त्यामुळे ऋतूचक्रातील बदल व मॉन्सूनचा बेभरवसा दिवसेंदिवस"
पर्यावरण विषयक अभ्यासक.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा