बोर्लीपंचतन व नजिकच्या गावांमध्ये नेटवर्क गायब


  • वेळास आगर येथील जिओ टॉवर अजूनही लाल फितित.
  • विद्यार्थ्यांना नाहक त्रास;भाजपा युवा मोर्चा चा आक्रमक पवित्रा

पुष्कर रिळकर : श्रीवर्धन

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आगर येथे गेल्या वर्ष भरापासून जियो कंपनीच्या टॉवर चे काम चालू आहे.या कंपनीच्या टॉवर चे काम वेळास येथे होत असल्यामुळे स्थानकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहोत या टॉवर मुळे परिसरातील नेटवर्क   ची अडचण दूर होणार आहे. परंतु गेल्या वर्षी चालू झालेल्या या टॉवर चे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. कंपनीचे अधिकारी 1-2 महिन्यातून एकदा इथे झळकतात व थोडेफार काम करून निघून जातात असे स्थानिकांकडून समजले.

अजूनही सर्व कॉलेज , शाळांमधून ऑनलाईन   पद्धतीने शिकवले जात आहे परंतु नेटवर्क कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क साठी स्थानिक विद्यार्थ्यांना 2-3 किमी वर जाव लागत आहे वेळास इथे जियो कंपनीच्या टॉवर चे काम चालू झाल्याने परिसरातील नागरिकांनी आपले सिम कार्ड जियो कंपनीचे करून घेतले परंतु आता नेटवर्क कंपनीच्या सेवेला घरघर लागली आहे व कंपनी च्या ग्राहकांनी केलेले दोन व तीन महिन्यांचे रिचार्ज कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा न वापरता संपत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.

श्रीवर्धन शहर व म्हसळा शहर या ठिकणी सर्वच कंपन्यांचे नेटवर्क सुरळीत आहे. परंतु वेळास,वडवली, बोर्ली या गावांकडे नेटवर्क कंपन्यांचे अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत  असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.मोबाईल कंपन्यांनी या सर्वांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.ग्राहक सर्वच नेटवर्क कंपनीच्या सेवेला त्रासले असून कंपनी सुरळीत व उत्तम दर्जाची सेवा कधी देणार व टॉवर चे काम पूर्ण कधी होणार असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे.

वेळास येथील गेल्या वर्षी चालू झालेले जियो टॉवर  चे काम अजूनही का थांबले आहे व ते काम किती पूर्ण झाले आहे हे जाणून घेण्यासाठी  जियो कंपनी चे आधिकरी श्री.संजित सिंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ते सांगण्यास टाळाटाळ केली.


गेल्या वर्षी सुद्धा भाजपा विदयार्थी आघाडीने या बद्दल आवाज उठवला होता व त्यामुळे जियो कंपनी कडून नेटवर्क पुर्वर्त करण्याचे आश्वासन सुद्धा मिळाले होते. पण अजून ही नेटवर्क ची समस्या आहेच.आणि आता जर 2 महिन्याच्या आत वेळास येथील टॉवर चे काम पूर्ण झाले नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण कंपनी ला धडा शिकवू. -ॲड.श्री.जयदीप तांबुटकर,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष द.रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा