म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहीत्य भेट : म्हसळ्यात होत आहे कौतुक



संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा ग्रामिण रुग्णालयात तालुक्यातील कोव्हीड रुग्णांवर इलाज केले जात असून नव्याने४५ खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू करण्यात आले आहे.संस्था चांगले काम करीत असतानाच त्याना मदत म्हणूनअमेरिका स्थित बर्मिंगहम (अलाबामा)येथील कोकणी असों सीएशनचे सामिर ऊकये,ईम्रान बगदादी आणि म्हसळा स्थित  साजिकसंस्था म्हसळा की आवाज या संस्थेचे मुसद्दीक ईनामदार,नदीम दफेदार या मंडळीनी नुकतेच म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला ४ वॉर्ड /ऑपरेशन पार्टीशिअन,४ ऑक्सीजन सिलेंडर ट्रॉली, वॉटर फिल्टर & कुलर, १ व्हीलचेअर,५०ऑक्सीजन मास्क,ब्ल्यू मास्क ईं. रुग्णोपयोगी साहीत्य भेट दिले यावेळी डॉ.महेश मेहता,डॉ.अलंकार करंबे , डॉ.सोनाली करंबे, पॅथॉलॉजिस्ट सुचिता बांदेकर,प्रेरणा पवार,फॉर्मासीस्ट तनिशा भायदे,लॅब टेक्नी.दिक्षा मोहीते,महमदअली उर्फ भाई दफेदार,अमीर कादीरी,अ.शकूर घनसार,नईम दळवी,फारुक मेमन,आसीम काजी, आजीम घरटकर, इर्शाद धायरेकर, अंकुश खताते आदी मंडळी उपस्थित होते.

" म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे जेष्ठ वैद्यकिय आधिकारी डॉ.महेश मेहता व स्थानिक डॉ.अलंकार करंबे यांच्या जवळ संर्पक साधला असता कोव्हीड रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) मध्ये काही रुग्णोपयोगी वस्तूंचीआवश्य- कता आहे. मदत म्हणून वस्तू दिल्या अद्यापही व्यवस्थापनाने काही मागणी केल्यास नक्कीच मदत देता येईल" मुसद्दीक ईनामदार,म्हसळा की आवाज , सामाजिक संस्था.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा