रायगड जिल्ह्यांतील सर्व लसीकरण केंद्रावर लस घेण्यापूर्वीच होणार अँटीजन टेस्ट.


(प्रतिनिधी म्हसळा)
जिल्ह्यांत १८ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु आहे, लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होत आहे, या गर्दीमुळे कोविड१९चा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्ह्यांतील 
काही केंद्रावरील कर्मचाऱ्याना कोविड १९ ची लागण झाल्याने जिल्ह्यांतील सर्व लसीकरण केंद्रांवर यापुढे लस घेण्यापूर्वी लसीकरण लाभार्थांची अँटीजन टेस्ट (Rapid Antigen Test)घेण्यात यावी, तशा  नोंदी ICMR portal वर करण्यात याव्या असा आदेश जिल्हाधिकारी रायगड यानी दिले आहेत.जिल्ह्यांतील सर्वच लसीकरण केंद्रावर तशा बाबत सर्व व्यवस्था करण्याचे आदेश रायगड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यानी संबधीताना दिले आहेत. म्हसळा तालुक्यात ग्रामिण रुग्णालय म्हसळा, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा,मेंदडी व खामगाव अशी चार लसीकरण केंद्र असून,एका मोबाईल व्हॅनव्दारे तालुक्यातील दुर्गम भागात लसीकरण केले जाते, तालुक्यात अद्यापपर्यंत पाहिला डोस घेतलेले लाभार्थी १०२९९, दोनही डोस घेतलेले तभार्थी ६१० आहेत. तालुक्याचा लसीकरणाचा वेग मंद असून,प्रमाणही अल्प आहे. जिल्ह्यांत लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या पुढील प्रमाणे आहे. Frontline Workers ८६८३७, Health Care Workers ३८३७५, वय १८-४४  १५५५१९,वय ४५-६० २४२९४८ ,वय ६० चे पुढील १८९२७० जिल्हाधिकारी कोविड १९ नियंत्रण कक्षाने कळविले  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा