(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायती च्या कारभारात पारदर्शकता नसून आर्थिक घोटाळा आसल्याची तक्रार योगेश महागावकर व ग्रामस्थानी केल्याचे सांगण्यात आले.त्या बाबत माहीती आधिकार २००५ अन्वये माहीती घेतली असता ग्रामपंचायतीत बहुतांशआर्थिक व्यवहारामध्ये आमियमितता आसल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. घोणसे सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यांची तात्काळ चौकशी व नितंबनाची मागणी विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस व प्रविण दरेकर यांच्याकडे केली आहे.
घोणसे ग्रामपंचायतीत म्हशाची वाडी,वडाची वाडी,केळेवाडी,निवाची वाडी,बौध्दवाडी, कानसे वाडी अशा ७ वाडया असून सरपंच या कधीच कार्यालयात येत नाही अशीही तक्रार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक वाडीवरील विकास कामातील आर्थिक व्यवहारात सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यांची मिलीभगत आसल्याचे माहीती आधिकारात स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीला लागणारे Hardware पासून Sanitazar सॅनिटायझर पर्यंतचे सर्वसामान SGM इंटरप्रायझेस दिवा (ठाणे) यांच्याकडून खरेदी केली जाते असे स्पष्ट झाले आहे.
घोणसे ग्रामपंचायतीमध्ये खालील कामामध्ये अनियमितता व आर्थिक घोटाळा आसल्याच्या
तक्रारी पुढे येत आहेत १) कृषी अवजारांचे वाटप रू ४९,९९८ (किरकोळ वाटप करून अपहरण) २) ग्रामस्थाना Sanitazar सॅनिटायझरचे वाटप रु ७८,७५०(Not for Sale ) च्या जेलचे वाटप करून Sanitazar वाटपाचे रक्कमेचे अपहरण ३) घोणसे विहीर साफसफाई रु३३०००(DEO डेटा इंट्री ऑपरेटर च्या नावे सक्कम काढून अपहरण)४) मागास वर्गीय व दिव्यांग निधी वाटप (आर्थिक अनियमितता),५) विचारेवाडी विहीर डागडुजी रु४७००० / (१०-१२ चिऱ्याना पॉईंटींग व जाळी सुमारे खर्च ५ते६हजार उर्वरीत आर्थिक अपहरण) ६) शेतकरी आभ्यास दौरा रु१०,००० ७) प्रा.शाळा प्रोजेक्टर ४३,८२० व प्रा. शाळा संगणक रु ३३०००(बाजार भावापेक्षा जास्त).
घोणसे ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यानी संगनमताने केलेल्या गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असेही पुढे येत आहे.
"घोणसे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक निलम सुतार यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रार आली आहे, चौकशी सुरु आहे"
सुनिल गायकवाड,विस्तार आधिकारी (ग्रामपंचायत) पंचायत समिती म्हसळा.
फोटो १)घोणसे ग्रामपंचायत कार्यालय
२)विचारेवाडी विहीर डागडुजी (५ते६हजाराचे काम खर्च मात्र रु४७०००)
३)प्रा.शाळा घोणसे.
Post a Comment