'चव महाराष्ट्राची' राज्यस्तरीय स्पर्धेत रोह्याच्या सौ. मानसी चापेकर यांचे सुयश ; मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव



रोहे (वार्ताहर)
रोह्यातील प्रतिभासंपन्न साहित्यिक सौ. मानसी चेतन चापेकर यांनी महाकवी कालिदास दिनानिमित्त आयोजित 'चव महाराष्ट्राची'या नावाजलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला.

ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अनेक साहित्यिकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
सौ. मानसी चापेकर यांनी आपल्या बहारदार व उत्कट सादरीकरणाने मान्यवर परीक्षकांची मने जिंकली.

सौ. मानसी चापेकर यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली असून कविता सादरीकरणाचे अनेक यशस्वी कार्यक्रम केलेले आहेत.
त्यांनी चव महाराष्ट्राची या मनाच्या स्पर्धेत राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल रोह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा