धुँवाधार पावसात केलटे ग्रामपंचायतीचा साकव गेला वाहूनग्रामपंचायतीचे ५ लक्ष पाण्यात.



संजय खांबेटे : म्हसळा 
जुलै दि.११-१२ रोजी पडलेल्या धुँवाधार पावसात केलटे ग्रामपंचायतीचा कुणबी समाज स्मशान भूमीकडे जाणारा साकव  वाहून गेल्याची घटना घडली. दि.११व१२ जुलै या दोन दिवसांच्या कालावधीत अनु.२१० व १२३ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.स्मशान भूमीकडे जाणारे अन्य दोन पर्यायी रस्ते आसल्याने ग्रामस्थाना स्मशानात जाणे अडचणीचे होणार नाही.
  सुरवातीपासून वादग्रस्त असणारा साकवा चा भराव जोरदार झालेल्या पावसात वाहून गेल्याने साकवासाठी संपलेले रु ५ लक्ष वाहून गेल्याची चर्चा आहे. नोव्हों.२०१९ च्या ग्रामसभेत सदर साकवाची मागणी केली होती. साकव बांधताना शेजारील बागायतदारांचे बागायतीना धोका होऊ नये अशा पध्दतीच्या मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या ,साकव बांधलेल्या पाहिल्याच वर्षात ग्रामपंचायतनिधीचे झालेले आर्थिक नुकसान शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले. "सदर साकवासाठी जिल्हा नियोजन ५०४४ मधून ५ लक्ष निधी मंजूर झाला, कामाचे E Tendarning होऊन काम सुरु आहे"
ग्रामसेवक,केलटे

"साकव चुकीच्या जागी होणार,स्थानिक नागरिकां साठी आलेला निधी वेळीचअन्यत्र वळवावा म्हणून स्थानिक शेतकऱ्यानी माहीतीचा आधिकार २००५अन्वये एप्रिल २१ ला या बाबत माहीती विचारली असता अद्यापही संबंधीतानी उत्तर दिले नाही, याचाच अर्थ साकवाचे कामात भ्रष्टाचार झालेला आहे." 
माहीती अधिकार अपिलार्थी, केलेटे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा