● अविनाश वाडकर करतात शेतीसह दुग्धव्यवसाय जोडधंदा
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर (प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर अदाड हे गाव आहे. मुरुड तालुक्यातील अदाड या गावात शेती, पशुपालन चांगल्या प्रमाणात करतात. समुद्र जवळ असल्याने गावाच्या हवामानामध्ये आद्र्ता असते. गावातील शेतकरी भात, भाजीपाला, कलिंगड तसेच दुग्ध व्यवसाय देखील करतात.
रिलायन्स फाउंडेशन गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहचून पशुपालन व शेती विषयी माहिती पोहचवत आहे. 42 वर्षीय अविनाश गोपाल वाडकर आणि इतर 10 लोकं अशा एका कुटुंबामध्ये राहतात. ते अदाड गावचे रहिवाशी असून शेती करून त्याला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय मध्ये चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच पूरक खाद्य देणे महत्त्वाचे आहे. अनुभव जरी असल्यास वेळोवेळी तांत्रिक आणि उपयोगी मार्गदर्शन मिळाल्यास दुग्ध व्यवसाय भरपूर फायदेशीर ठरतो. याचाच उपयोग अविनाश वाडकर यांनी एका रिलायन्स फाउंडेशनच्या पशुपालन आरोग्य शिबिरास भाग घेऊन घेतला आहे.
अविनाश वाडकर यांच्याकडे एकूण 10 जनावरे आहेत त्यात 1 जाफ्फ्राबाद म्हैस व 1 मुऱ्हा म्हैस तसेच 1 गिर गाई आहे. 2 होलस्तिन फ्रिसियन गाई आहेत, गिर गायीचा एक खोंड आहे व एक होलस्तिन फ्रिसियन गाईचा खोंड, 2 पारढे व २ खिल्लार बैल आहेत. ह्या सर्व जनावरांचा चारा व्यवस्थापन, पानी व्यवस्थापन तसेच दुधाळ जनावरांना केल्शियम व मिनिरल मिक्सचर ह्यांचा व्यवस्थापन करावे लागते. मिनिरल मिक्सचर व केल्शियम ची किंमत महाग असल्यामुळे ते कधी कधी परवडत नाही.
रिलायन्स फाउंडेशन व पशूसंवर्धन विभाग मुरुड, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी दरम्यान एक जनावर आरोग्य शिबीर अदाड गावात आयोजित केले होते. जनावरांच्या आरोग्य तपासणी सहित पशुपालक यांना केल्शियम टॉनिक, मिनिरल मिक्सचर व भूक वाढवण्यासाठी औषध वाटप करण्यात आली.
अविनाश वाडकर यांनी रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभाग मुरुड अशाप्रकारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला व त्यांना जनारांच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तपासणी व औषधे मोफत भेटली. केल्शियम टॉनिक व मिनिरल मिक्सचर चे प्रमाण व आहारात कसे मिश्रण करावे, ही माहिती कार्यक्रमात दिली. तसेच वाडकर ह्यांनी जनावरांच्या आहारामध्ये केल्शियम टोनिक व मिनिरल मिक्सचर यांचा समावेश केला आणि त्यांना 4 दिवसातच फरक जाणवू लागला. याअगोदर त्यांना म्हैसीला 7 लिटर व गाईना 8 लिटर दूध दिवसाला मिळायचा. आहारामध्ये केल्शियम व मिनिरल टाकल्यामुळे त्यांना म्हैसीला दिवसाला 8 लिटर व गाईला 10 लिटर अशी दूध वाढ झाली. वाडकर यांना दुधाचा दर सुद्धा चांगला मिळत असून टॉनिक आणि मिनिरल मिक्सचर याचा रिझल्ट पण चांगला भेटला व त्यांना एकूण 12,000/- रूपयांचा नफा झाला आहे. तसेच कार्यक्रमात त्यांच्या जनावरांची तपासणी सुद्धा झाली.
रिलायन्स फाउंडेशन मार्फत आता अविनाश वाडकर यांना दररोज थेट फोनवर शेती व पशुपालन विषयी माहिती मिळते. अशीच माहिती सर्व शेतकर्यांना मिळाली पाहिजे व नवनवीन उपक्रम असेच चालू ठेवावेत अशी विनंती अविनाश वाडकर यांनी करून रिलायन्स फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
Post a Comment