श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवार दिनांक १४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता दंगा काबू योजनेचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी, बकरी ईद, गोपाळकाला तसेच पुढे येणाऱ्या सणांच्या अनुषंगाने दंगा काबू योजना घेण्यात आली. सदरची दंगा काबू योजना श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या उपस्थितीत विभागातील ५ अधिकारी व ३० कर्मचारी हजर होते. सदरची दंगा काबू योजना ११ वाजता सुरू करून वरिष्ठांच्या आदेशानुसार १२:३० वाजता समारोप करण्यात आली.
Post a Comment