बोर्लीपंचतन येथे कबड्डी दिन साधेपणात साजरा



मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 
आपले आयुष्य कबड्डी (Kabddi) या खेळाला वाहुन कबड्डी सातासमुद्रापार पोहचवणारे व कबड्डीला विशेष महत्त्व प्राप्त करून देणारे कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा १५ जुलै या जन्मदिनाच्या स्मृत्यर्थ अर्थात कबड्डी दिनाचे औचित्य साधत श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील चिंचमाता क्रिडा मंडळाच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत "कबड्डी दिन" साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी चिंचमाता क्रिडा मंडळाचे अध्यक्ष समिर परकर यांनी बुवा साळवी यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करताना सांगीतले की "बुवा साळवींनी आपलं पूर्ण आयुष्य कबड्डीला महत्व प्राप्त करून देण्यासाठी दिले.सात खेळाडूंचा कबड्डी खेळ म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी बुवांनी खूप संघर्ष केला होता त्यामुळे खेळाडूंच्या मूलभूत गरजा ओळखून त्यांना मार्गदर्शन व्हावे,त्यांच्यासाठी शिबिरे व्हावीत महाराष्ट्रात कबड्डीचे एखादे उत्तम प्रशिक्षण केंद्र होउन त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु तयार व्हावेत असा संकल्प आपण सोडायला हवा.तरच हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल."
याप्रसंगी चिंचमाता क्रिडा मंडळाचे अध्यक्ष समिर परकर उपाध्यक्ष विनोद हेदुकर सचिव श्रीप्रसाद तोंडलेकर कर्णधार कृष्णा कदम,उद्देश वागजे, सौंगध तोडणकर सर्व पदाधिकारी व खेळाडु उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा