तळा प्रतिनिधी -राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ* रजि. नं. ALC-17 / 10744 हे मा. वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण भारतामध्ये शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक-खाजगी उद्योग व उपक्रमात नोकरी करणाऱ्या संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकारासाठी संवैधानिक मार्गाने संघर्ष करणारे, श्रमिक संघ अधिनियम १९२६ अंतर्गत नोंदणीकृत राष्ट्रीय स्तरावरील कामगार-कर्मचारी संघटन (ट्रेड युनियन) आहे.महाराष्ट्र सरकारच्या एससी, एसटी, व्ही. जे. एन. टी. एस. बी. सी, ओबीसी या सामाजिक समुहांना पदोन्नतीमधील आरक्षण नाकारणाऱ्या ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात आणि महाराष्ट्र सरकारचे मागासवर्गीयांचे आरक्षण, कामगार, कर्मचारी, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्याविरोधी शासन निर्णयांच्या आणि धोरणाच्या विरोधात संघटनेच्या वतीने राज्यस्तरावर महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात ३५८ तालुक्यात एकाच वेळी पुढील ४ टप्प्यांमध्ये दिनांक ७ जुलै २०२१ ते दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत "प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ" आंदोलन केले जाणार आहे.चार टप्प्यात होणाऱ्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आज सोमवार, दिनांक १२ जुलै २०२१ सकाळी ११ ते ४ वाजेपर्यन्त तहसील कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने तालुकस्तरीय धरणे व घंटानाद आंदोलन हा पार पडले.सदर आंदोलनात विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक-खाजगी उद्योग व उपक्रम या आस्थापनांच्या कार्यालयात कार्यरत असणारे कामगार/कर्मचारी, त्यांच्या संघटना यांचेकडून कर्मचारी/ कामगार कर्तव्य करीत असतांना काळीफीत बांधून निषेध करणार आहेत.
सदर निवेदन तळा तालुक्यात मा. तहसीलदार तहसील कार्यालय तळा,यांच्या कडे सुपुर्द करतांना धनंजय पवार (राज्य कोषाध्यक्ष प्रोटान ),ॲड.उत्तम कोळेकर (संयोजक RMBKS),गोविंद हिरवे (मौर्य क्रांती संघ तळा ), सुधीर जाधव, गुलाबसिंग पावरा (प्रोटान,तळा तालुका),स्वप्नील वरंडे, वसंत गायकवाड (बामसेफ),संतोष पटाईत (नफ),रमेश पवार (राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद तळा), विजय पावरा (राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ),विजय येलवे,सुनिल बैकर (महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तळा) रमेश मोहिते (राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा ),प्रदीप ठोंबरे (छत्रपती क्रांती सेना),शोभा जाधव, पुनम पवार (राष्ट्रीय मूलनिवासी महीला संघ),राम सावंत(बहुजन क्रांती मोर्चा),मंगेश पारावे (भारत मुक्ती मोर्चा),अनिष येलवे ( बुध्दीस्ट इंटरनँशनल नेटवर्क ),साकीब म्हसकर (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा),वंदना पतारी, संजना साळवी (भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ),जितेंद्र भोसले (भारतीय विद्यार्थी मोर्चा), अमरनाथ गाडे (सोशियल मिडीया प्रभारी),सुधीर शिंदे (आरएमबीकेएस असंघटित कामगार) हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
साहेब,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन शाखा तळा तालुका तर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार. बहुजन समाजासाठी व समस्यांच्या विरोधात अशीच आपली पत्रकारिता द्वारे सहकार्य करावे.आपल्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा...🙏🙏🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद आपण केलेल्या प्रसिद्धी बद्दल आपले आभार.
ReplyDeletePost a Comment