संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत मेंदडी खदि. १८/०७/२०२१ रोजी १०.३० वा च्या सुमारास मौजे मेंदडी येथील खाडीच्या पाण्यात वाहुन गेलेला माच्छिमार सुरेश हरेश पायकोळी वय ४२ वर्षे याचा मृतदेह राजपुरी खाडी पात्रात तब्बल ४८ तासानी शोध पथकाला आज सकाळी ७.३० च्या सुमारास मिळाला.
म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील मेंदडी गावा तील मच्छीमार सुरेश हरेश पायकोळी
खाडीच्या पात्रात वाहुन गेलेली बोट आण ण्याकरिता दुसऱ्या एका लहान बोटीने गेले असता सदरची बोट पाण्यात बुडाली, बोटीतील मच्छीमार सुरेश खाडीच्या पाण्याला भयंकर गती आसल्याने वाहून गेल्याची घटना घडली होती.मृत माच्छिमार सुरेश याच्या समवेत असणारा त्याचा सहकारी शशिकांत लक्ष्मण पाटील ह्याने प्रसंगावधान राखल्याने तो वाचल्याचे सहा.पोलीस निरीक्षक ऊध्दव सुर्वे यानी सांगितले.यांचा दोन दिवसापासुन स्थानिक लोकांचे व साळुंखे रेस्कु टीम, महाड यांचे मदतीने शोध घेतला,आज रोजी स्थानिक लोकांचे मदतीने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह सकाळी ०७.३० वा च्या सुमारास राजपुरी खाडी पात्रात तरंगत असताना मिळाला.
सदर घटनेची अपघात मृत्यू रजी. नं. ११ ने म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली, घटनेचा तपास पो. हेड कॉन्स्टेबल रामदास सुर्यवंशी सहा. पोलीस निरीक्षक ऊध्दव सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली करीत आहेत.
" म्हसळा तालुक्यातील खाडी किनाऱ्या लगतची म्हसळा,खरसई, आगरवाडा, मेंदडी, वारळ, काळसुरी,तुरूंबाडी, आडी म.खाडी,पाभरे,खारगाव (बु), कांदळवाडा, आंबेत,बंडवाडी या गावाना तलाठी, ग्रामसे वक,पो. पाटील, कोतवाल यांच्यामार्फत ११ते १५व १६ ते२१ पर्यंत जोरदार अति वृष्टी होण्याचे हवामान खात्याच्या इशाऱ्या ची माहीती आणि या कालावधीत घरातच रहा सुरक्षीत रहा,आवश्यक नसेल तर घरा बाहेर पडू नये आपला जीवआपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा आहे अशा प्रकार चा संदेश सावधानतेचा उपाय म्हणून वेळो वेळी देण्यात येतो"
के.टी. भिंगारे, नि. ना. तहसीलदार म्हसळे
Post a Comment