सौ. मनोलु मनोज गुरव यांची महिला सुरक्षा संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड


सौ. मनोलु मनोज गुरव यांची महिला सुरक्षा संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
रोह्यातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
रोहा (वार्ताहर)
रोहे शहरातील सक्रिय महिला कार्यकर्त्या सौ. मनोलु मनोज गुरव यांची महिला सुरक्षा संघटना ( Women's Security Association) या महिलांच्या न्याय हक्कांसाठी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महिला सुरक्षा संघटना ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात महिलांसाठी उल्लेखनीय काम करत असून रायगड जिल्ह्यातील महिलांसाठी देखील ही संघटना आधारवड ठरणार आहे.

या संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी रोह्यातील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या सौ. मनोलु मनोज गुरव यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर  रोह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या संघटनेच्या रोहे शहर अध्यक्ष पदी सौ. वनिता जंगम यांची निवड करण्यात आली आहे.

या संघटनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष श्री. किसन पाटील व  कोकण विभाग अध्यक्षा सौ. दीपिकाताई चिपळूणकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार,कौटुंबिक हिंसाचार आदी विषयांवर प्रभावी कार्य करण्याचा मानस या संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी सौ. मनोलु गुरव आणि सौ. वनिता जंगम यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा