टीम म्हसळा लाईव्ह
ग्रामीण भागातील प्रवाशांना सेवा देणारी जीवनवाहिनी म्हणून एसटी बसची ओळख आहे . परंतु , आता याच जीवनवाहिनीची ओळख बदलताना दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बस दाखल झालेल्या नाहीत . त्यामुळे आहे त्याच बसगाड्यांची डागडुजी करून बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत . उन्हाळा , पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये कुठलेही तक्रार न करता बसचालक व वाहक अविरत व नियमित सेवा देत आहेत . उन्हाळा व हिवाळ्याच्या दिवसांत फारसा त्रास होत नाही . मात्र , पावसाळ्यात चालक - वाहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .
पावसाळा सुरू झाल्यास तात्पुरती डागडुजी करून बसगाड्या धावत असल्या तरी जास्त पावसात बसमध्ये छत्री किंवा रेनकोट घालण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या रोषाचा सामना चालक व वाहकांना करावा लागत आहे. त्यातल्या त्यात श्रीवर्धन डेपो आणि आनंदी प्रवासी हा दुर्मीळ योगच अनेक तक्रारी करूनही सुविधा मिळणार नसतील तर या डेपोला जाग येणार कधी अस प्रश्न सामान्य जनता विचारत आहेत.
दिनांक 19 जून रोजी आम्ही दिघी तुरुंबाडी मुंबई गाडीने सकाळी ४:३० च्या सुमारास प्रवास करीत असताना संपूर्ण गाडीत पावसाचे पाणी लीक होत होते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले . प्रवाशांनी गाडी बदली करून देण्याची विनंती केली पण दुसरी गाडी देण्यास नकार संबंधितानी नकार दिला.
- दिनेश खोत, प्रवासी
Post a Comment