म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात भापट या गावी वाचनालय / वृत्तपत्र वाचनालय सुरू



राष्ट्र सेवा दल साने गुरुजी बालभवन वाचनालय सुरू

म्हसळा तालुक्यातील भापट गाव येथे साने गुरुजी बालभवन वाचनालय/ वृत्तपत्र वाचनालय सुरू

प्रकाश गाणेकर म्हसळा

 दिनांक २ जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजता . उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती गाव अध्यक्ष  श्री प्रविण ठोंबरे, उपसरपंच श्री रविंद्र कुवारे, ग्रा .सदस्या वंदना मोहिते, महिला अध्यक्षा राजेश्री बेटकर, पोस्टाच्या पोष्ट मास्तर रूतिका काकडे , पोष्टमन श्री सिध्दांत शिंदे, ज्युनिअर कॉलेज विद्यार्थी गौरव मोहिते, सिनिअर कॉलेज  विद्यार्थी प्रेरणा मोहिते प्राथमिक शिक्षक श्री जयसिंग बेटकर , अंगणवाडी सेविका सौ जया बेटकर आदी मान्यवर व वाचक उपस्थित होते. तसेच बाल विद्यार्थी उपस्थित होते
विद्यार्थ्यांना गोष्टींची छान छान पुस्तके, चालू घडामोडींवर पुस्तके,मासिके , लोकराज्य, जीवन शिक्षण मासिक अंक , शेती विषयी मासिके,  महापुरुषांची पुस्तके, जनरल नॉलेज पुस्तके ई.  (पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यासाठी देवघेव रजिस्टर ठेवण्यात आले आहे.)
वृत्तपत्रे - दैनिक सागर , सकाळ, पुढारी, म्हसळा टाईम्स, नवराष्ट ई.

खेडोपाड्यातील, अतिशय दुर्गम भागातील भापट या ठिकाणी प्रथम प्रयत्न या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा