म्हसळा करांसाठी सकारात्मक बातमी कोव्हीड १९ रुग्णसंख्या कमी होऊ लागली

म्हसळा करांसाठी सकारात्मक बातमी कोव्हीड १९ रुग्णसंख्या कमी होऊ लागली


आज फक्त एक पाझीटीव्ह तब्बल १० रुग्णानी केली करोनावर मात.
(म्हसळा प्रातिनिधी) म्हसळा तालुक्यातील कोव्हीड १९ रुग्णसंख्या कमी होऊ लागली आसल्याची माहीती तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यानी दिली . तालुक्यात आज फक्त एक रुग्ण पाझीटीव्ह सापडला तर तब्बल १० रुग्णानी करोनावर मात केल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधीत ९७७, उपचार सुरु असलेले केवळ २५ रुग्ण आहेत.आजपर्यंत ९०३ रुग्णानी कोरोनावर यशस्वी मात केली.म्हसळा शहर १० रुग्ण बाधीत आहेत,तालुक्याचे ग्रामिण भागातील १५रुग्ण बाधीत आहेत, ते पुढील प्रमाणे वारळ २,निगडी २,मरीयामखार६, वरवठणे २,घूम १,खरसई १, तुरूंबाडी १असे आहेत.
२५बाधीत रुग्णांपैकी २० रुग्ण घरच्या घरी विलगीकरण(Home Isolation),३ उप जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, २ खाजगी रुग्णालयात उपचार घेत आसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा