संजय खांबेटे : म्हसळा
भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात दिनांक २४जुलै२०२१ पर्यंतअतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यानुषंगाने म्हसळा तालुका महसुल व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यात आज पर्यंत२४५३ मि.मि. पाऊस झाला आहे.मागील १८दिवसात १२८६मि.मि.असे विक्रमी पर्जन्यमान झाल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले.
तालुक्यातील खाडी किनाऱ्या लगतच्या म्हसळा,खरसई,आगरवाडा,मेंदडी,वारळ, काळसुरी,तुरूंबाडी,आडी म.खाडी,पाभरे, खारगाव (बु), कांदळवाडा,आंबेत,बंडवाडी या गावाना तसेच वावे शेख मोहल्ला, खारगाव (सकलप), लिपणी,देवघर (घोणसे) ,मरयामखार(खारगाव) या दरड ग्रस्त गावाना तलाठी, ग्रामसेवक,पो. पाटील,कोतवाल यांच्यामार्फत २४जुलै २०२१ पर्यंत जोरदारअतिवृष्टी होण्याचे हवामान खात्याच्या इशाऱ्याची माहीती आणि या कालावधीत घरातच रहा सुरक्षीत रहा,आवश्यक नसेल तर घरा बाहेर पडू नये आपला जीवआपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा आहे अशा प्रकारचा संदेश सावधानतेचा उपाय म्हणून गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा व या कालावधीत महत्वाची काळजी कशी घ्याल याबाबत माहिती देण्यात आल्याचे तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यानी सांगितले या काळात काही कमी जास्त प्रसंग उद्भवला तर आपत्ती व्यवस्थापन कक्ष म्हसळा ०२१४९-२३२२२४ (तहसील कार्यालय) किंवा पोलीस स्टेशन म्हसळा ०२१४९ -२३२२४०येथे संपर्क साधावा असे आवाहन भिंगारे यानी केले आहे.
Post a Comment