दिघी कुडगाव आदिवासी वाड्यांवर सौरदिवे व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

दिघी कुडगाव आदिवासी वाड्यांवर सौरदिवे व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप


डॉ.राजेश पाचारकर मित्रमंडळाचा उपक्रम 

। बोर्लीपंचतन । मकरंद जाधव ।
विविध क्षेत्रात समाजहितासाठी गरीब गरजुंना सेवाभावी वृत्तीने मदत करुन सामाजीक बांधीलकी जपणारे बोर्लीपंचतन येथील डॉ.राजेश पाचारकर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव व नानवेली येथील आदीवासी वाड्यांवर भेट देउन तेथील साठ कुटुंबांना सौर दिवे,मेणबत्ती व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. त्याचबरोबर बोर्लीपंचतन,वडवली व दिघी येथील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थांना मास्क व सॕनीटायजरचे सुध्दा वाटप केले.
"शहरापासुन दुर दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पावसाळ्यात रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामारे जावे लागते.अशा वेळी या सौर दिव्यांचा त्यांना नक्कीच उपयोग होइल हा साधा आणि सरळ हेतू ठेवून आपण हा उपक्रम राबवत असल्याचे यावेळी डॉ.राजेश पाचारकर यांनी सांगीतले."
आनंदाच्या फुलांनी भरलेली ओंजळ इतरांच्याही हातात काहीशी रिती करुन गरीब गरजुंचे आयुष्य सुगंधी करणाऱ्या व तरुण पिढीत आपल्या विविध उपक्रमाने समाजभान रुजवणारे डॉ.राजेश पाचारकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.याप्रसंगी डॉ.राजेश पाचारकर मित्रमंळाचे सदस्य कौशल वाणी,सिध्देश्वर आंजर्लेकर,हेमंत किर, जोस्ना हेदुकर व डॉ.पाचारकर यांच्या पत्नी सौ.आरती कुळकर्णी पाचारकर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा