म्हसळा -प्रतिनिधी
पंचायत समिती म्हसळा व तालुका कृषी विभाग अधिकारी म्हसळा यांचे संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतरावजी नाईक यांचे जयंती निमित्त पंचायत समिती सभागृहात रोजी कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम समारोपाचा कार्यक्रम सभापती छायाताई म्हात्रे यांचे अध्यक्षतेखाली वृक्षारोपण व शेतकरी राजाला भाजीपाला बियाणे वाटप करून अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.आयोजित कार्यक्रमास उपसभापती संदीप चाचले, उपसभापती,मधुकर गायकर, पंचायत समिती सदस्य,तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष समिर बनकर,माजी सरपंच संतोष नाना सावंत,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,सहाय्यक गट विकास अधिकारी कदम,बाल विकास प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,सरपंच चंद्रकांत पवार,सरपंच रेश्मा कानसे,सदस्य महेश घोले,कृषि अधिकारी साळी,मंडळ कृषी अधिकारी सुजय कुसळकर,प्रकाश गाणेकर,तालुक्यातील शेतकरी, पंचायत समिती व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश साळी-कृषी अधिकारी यांनी केले. सुजय कुसळकर - मंडळ कृषी अधिकारी म्हसळा यांनी दिनांक 21जुन 2021 ते 1जुलै 2021 या कालावधीत राबविलेल्या कृषी संजीवनी मोहिमेबाबत तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबतची माहिती दिली.सभापती छायाताई म्हात्रे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी विभाग व तालुका कृषी विभाग यांच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा तसेच शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता भाजी पाला,फळबाग लागवड, दुग्धव्यवसाय,कुकुटपालन यांची सांगड घालून आपल्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागामार्फत मान्यवरांचे हस्ते तुर बियाणे व भाजीपाला बियाणे मिनीकिटचे वाटप करण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेडगे,विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले.कृषि दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती भवनाचे आवारात वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Post a Comment