किरकोळ कामासाठी जनता फेऱ्या मारून होते त्रस्त
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा पंचायत समितीला सध्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामध्ये ऐन कोरोना काळात महत्वाची भिस्त असणा ऱ्या आरोग्य विभागात मंजूर ७२ पदांपैकी ३१पदे रिक्त आसल्याचे चित्र आहे.आरोग्य विभागाअर्तंगत येणाऱ्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह म्हसळा,मेंदडी आणि खामगाव या तिनही प्रा.आ.केंद्रांची परिस्थी ती सारखीच आहे.तालुक्याच्या ग्रामविका सात महत्वाचे काम करणाऱ्या ग्रामपंचायत विभागाची परिस्थीती बिकटआहे. तालुक्यात ३९ ग्रामपंचायती व ८० गावे आहेत,गाव पातळीवर ग्रामसेवक अंत्यत प्रभावी कार्य करीतअसतात, शासनाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात.परंतु या योजनांची अंमल बजावणी करण्याकरिता तालुक्यात पुरेसे ग्रामसेवक नसल्याने पंचायत समिती प्रशासनाला शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविताना तारेवरची कसरत करावी लागते.पंचायत समितीच्या प्रशासनात ६ ग्रामसेवकाना प्रत्येकी ३ ग्रामपंचायती,१० ग्रामसेवकाना प्रत्येकी २ ग्रामपंचायती सांभाळाव्या लागतात . तालुक्यात १७ ग्रामसेवककांवर ३९ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.
पंचायत समितीमधील अन्य विभागांतील रिक्त पदे पुढील प्रमाणे सामान्य प्रशासन ९, अर्थ २,कृषी विभाग,पशुसंवर्धन विभाग ४, बांधकाम विभाग ६, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग ७, शिक्षण विभागातील महत्त्वाचे गटशिक्षणाधिकारी पद गेल्या ६ वर्षांपासून रिक्त आहे. तर चार ज्येष्ठ व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपैकी एकच पद भरले आहे,उर्वरित तीन व अन्य ८७ पदे रिक्त आहेत. पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा आहे पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत.
"जिल्ह्यात रिक्त पदांचे बाबतीत (तालुका प्रशासनात) जिल्ह्यात म्हसळा तालुक्याचा नंबर एक असेल म्हसळा करानी परिपूर्ण सत्ता एकाच पक्षाकडे दिली आसताना संबधीतानी म्हसळाकरांची रिक्तपदाची समस्या सोडविणे क्रमप्राप्त आहे"-महादेव पाटील, माजी सभापती ,पंस. म्हसळा
"प्रशासकीय पद्धतीनुसार म्हसळा पंचायत समितीच्या विविध विभागांच्या रिक्त पदांचा मासिक अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला जातो, स्थानिक लोकप्रतिनिधीनी आपल्या माध्यमातून पाठपुरावा करणे आवश्यक आहे"
वाय.एन. प्रभे, वरीष्ठ गट विकास अधिकारी .पं.स. म्हसळा
Post a Comment