लोणेरे (राम सिताराम भोस्तेकर )
माणगांव तालुक्यातील लोणेरे ते गोरेगांव या रस्त्याच्या रूंदीकरण करुन काॅक्रीटीकरण रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र या वर्दळीच्या ३ कि.मी.मार्गावरील रस्त्यावर काही ठिकाणी थोड्याच प्रमाणात काॅक्रिटीकरण झाले अाहे.तर डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडून भर पावसात पाणी साचून डबक्याचे स्वरुप आले आहे.या खड्डेमय डबक्यातून मार्ग काढतानां वाहनचालकांनां कसरत करावी लागत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.या मा्र्गावरून प्रवास करतानां प्रवाशी वर्गासह वाहनं चालक त्रस्त झाले असून हा रस्ता केंव्हां पूर्ण करणार ? असा सवाल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला विचारत आहेत.
लोणेरे ते श्रीवर्धन महामार्गावर रस्त्याचे काम होणार असून सध्या लोणेरे ते गोरेगांव हा ३ कि.मी.च्या रस्त्याचे काॅक्रीटीकरण गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून सुरू आहे.या कालावधीत ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्हीं बाजूस असणा- या गटारांचे बांधकाम काही ठिकाणी केले असून लोणेरे - गोरेगांव मार्गावरील मध्यभागात रस्त्याचे काम सुरू केले आहे.दरम्यान काही ठिकाणी एका बाजूस तर काही ठिकाणी दोन्हीं बाजूस एक किलोमीटर च्या रस्त्याचे काॅक्रिटीकरण झाले आहे.बाकी असलेल्या डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून भरपावसात खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत.अशा खड्डेमय डबक्यातून मार्ग काढतांना चारचाकी गाड्यासह रिक्षा चालक,दुचाकी स्वार व या मार्गावरुन प्रवास करणारे असंख्य प्रवासी हैराण झाले आहेत. ठिक ठिकाणी प्रचंड चिखलाचे साम्राज्य पहायला मिळत असून रस्त्याच्या कामासाठी आणलेली खडी रस्त्यावर पसरल्याने गेल्या चार पांच महिन्यात अनेक वाहनांचे अपघात या मार्गावर घडले आहेत.
या बाबत स्थांनिक लोकप्रतिनिधी गप्पा का ? असा ही सवाल विचारला जात आहे लोणेरे,साई नगर, गुरुदेव नगर, अयोध्या नगर, चिंचवली व लोणेरे गोरेगाव प्रवासी व या ठिकाणी राहणाऱे नागरिक व प्रवासी रस्त्यावर पडलेल्या चिखल व अस्तव्यस्त पाडलेली खडी या मुळे अक्षरशः वैतागले आहेत महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी खडीचा वापर केला जात आहे.सद्यस्थितीत वाहने ही खड्डयांतून जातांना पायी प्रवास करणा- या प्रवाश्यांनवर चिखल उडत आहे.खड्डे भरणे गरजेचं असताना मात्र ठेकेदार कंपनी कडून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. चिखलामुळे व अस्तव्यस्त पाडलेली खडी यामुळे वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाश्यांना तीन किलोमीटर जाईपर्यंत दमछाक होत आहे.तर लोकप्रतिनिधी या प्रकाराकडे कानाडोळा करून आहेत.नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करून देखील संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.त्यामुळे रस्त्याची जबाबदारी असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे.
सध्या राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आहे. म्हणून स्थांनिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे तरच वाहनचालकांसह प्रवाशांचा त्रास कमी होऊन लवकरच रस्त्याचे काम पुर्णत्वास जाईल.असे स्थांनिक सुज्ञ नागरिकांनचें मत आहे.
Post a Comment