रोहा : प्रतिनिधि
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड - पोलादपूर या तालुक्यातील झालेल्या महापुराने व दरड कोसळलयाने फार मोठे नुकसान झाले असून संपूर्ण संसार उध्वस्त होऊन जनजीवन पूर्णतः विस्कळित झालेले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा परिषद यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशाल्टी मॉलेक्युलस कंपनीचा माध्यमातून एक हात मदतीचा म्हणून दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना अन्न - धान्य जीवनाश्यक वस्तूंचे किट देण्यात आले..
गेल्या आठवड्यात पावसाने रौद्ररूप धारण करून अतिवृष्टी मुळे रायगड जिल्ह्यातील महाड - पोलादपूर सह रत्नागिरी जिल्ह्यातील खेड - चिपळूण तालुक्यांना फार मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने तसेच पुराच्या पाण्याने सर्वत्र हाहाकार माजविलयाने होत्याचे नव्हते झाले मोठ्या मेहनतीने व कष्टाने उभा केलेला साऱ्यांचे संसार उध्वस्त झाले जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले अशावेळी त्या दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना अन्न-धान्य आदी जीवनाश्यक वस्तू ,पाणी,कपडे यांची नितांत आवश्यकता असल्याने रायगड जिल्ह्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने" एक हात मदतीचा "म्हणून आपलाही खारीचा वाटा, सहयोग व सहकार्य व्हावे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन येथील अंशुल स्पेशाल्टी मॉलेक्युलस कंपनीचा माध्यमातून एक हात मदतीचा म्हणून दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
याप्रसंगी अंशुल स्पेशाल्टी मॉलेक्युलस कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष सातपुते,जनरल मॅनेजर लक्ष्मण शिट्यालकर, उपाध्यक्ष एम.मुर्तुझा,एच.आर. जनरल मॅनेजर गिरीष हिरवे,कंपनी जनसंपर्क अधिकारी किशोर तावडे,आदी कंपनीतील स्टाफ कर्मचारी वृंद उपस्थित होते..
Post a Comment