"गाडीवाला आया है,तो कचरा निकाल" : कचरा गाडीचा स्पीकर बंद असल्याने महीला वर्गाची होते धावपळ.



तळा किशोर पितळे

तळा नगरपंचायतीची दररोज कचरा नेण्यासाठी कचरा गाडी प्रत्येक वार्ड मधून दिलेल्या वेळेत फिरत असते.त्यामुळे जवळपास १/२मेट्रिक टनओला व सुका कचरा डंपिंग ग्राऊंडवर टाकला जातो.त्यामुळे साफ सफाई स्वच्छता होत आहे

पण गेला महीना भर कचरा गाडीवरील "गाडीवाला आया है,कचरा निकाल" स्पिकरसिस्टीमबंदपडल्यामुळे विशेषतः महीला वर्गाची चांगलीच धावपळ उडताना पहायला मिळते. शहरात सकाळ, संध्याकाळ गाडी कचरा गोळा करण्यासाठी फिरत असते. किराणा दुकानदार, भाजीपाला दुकानदार, हाँटेल व्यवसायीक, इतर घरातून कचरा टाकला जातो. सद्या पावसाळा असल्याने पावसात गाडी चा हाँर्न ऐकायला येत नाही व स्पीकर बंद असल्याने गाडी येऊन गेली का नाही समजत नाही. दुरुस्ती होईपर्यंत घंटा बांधली गेली नसल्याने समजत नाही तरी नगरपंचायत प्रशासनाने त्वरीत कचरा गाडी वरील स्पीकर सिस्टिम सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा