(१४ जुलै म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा महावितरणचे तालुक्यातील ५०७३ विज ग्राहकानी तब्बल रुपये ४ कोटी५२लक्ष ४७ हजार थकविले आसल्याचे सांगण्यात आले.वसुलीसाठी यापुढे कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे म्हसळा उपविभागीय महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी सांगितले.
तालुक्यातील आंबेत,खामगाव,मेंदडी, म्हसळा शहर (1st)आणि म्हसळा ॥ या विभागातील ५७७६ ग्राहकानी रुपये४ कोटी५२लक्ष ४७ हजार थकविले आहेत.यामध्ये घरगुती (Residential), व्यवसायिक(commercial) औद्योगिक (Industrial), सरकारी कार्यालये (Public Services), शेती(Agricultrial), पथदिवे(Streetlight), नळ पाणी पुरवठा (Public Water Works) आणि इतर ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यात घरगुती वापराचे ४ हजार २५६ग्राहकांकडे रु५१ लक्ष५४हजार,व्यवसायिक (वाणीज्य) वापराचे ३९० ग्राहकांकडे रु १०लक्ष७७हजार,औद्योगिक वापराचे ४६ग्राहकांकडे रु २लक्ष३२हजार, ,शेती वापराचे (Agricultrial) ५९ ग्राहकांकडे ५४ हजार, पथदिवे (Streetlight) वापराचे १३१ ग्राहकांकडे ३ कोटी ७३ लक्ष ११ हजार
नळ पाणी पुरवठा(Public Water Works) चे ६२ ग्राहकांकडे रुपये ८लक्ष ११ हजार रुपये.आणि ११३ शासकीय आणि निम शासकिय वापराचे ग्राहकांकडे ४लक्ष ५६ हजार थकबाकी आहे.
म्हसळा महावितरणकडून दररोज १०० हून अधिक थकीत वीज कनेक्शन कापण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती समोर येते आहे. २०१९ व करोना काळात म्हणजे एप्रिल २०२० पासून वीज बिल न भरणाऱ्या तसेच कोरोना काळात (Corornavirus Pand emic) या ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होती आशा थकीत सर्व ग्राहकां वर आता कारवाईचा कडक बडगा उचलला जाणार आहे. विविध विभागांची ही आकडेवारी हजारो कोटीत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत धारकांची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले.
"महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे.असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे"
प्रदीप पटवारी,उप-कार्यकारी अभियंता
महावितरण म्हसळा.
"१५ व्या वित्तआयोगातील निधीतून पथदिवे आणि पाणीपुरवठा विज देयके आदा करण्या बाबत ग्रामविकास विभागामार्फत पत्र आले आहे"
सुनिल गायकवाड, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती , म्हसळा
Post a Comment