तळा-किशोर पितळे
पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर तळा तालुक्यामध्येआज (११जुलै) सकाळ पासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. लावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.मात्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. तालुका डोंगराळ असल्याने उभ्या पाण्याची आधीक गरज असते.भात,नाचणी , वरी या व्यतिरिक्त इतर पीक नसल्याने पावसावर अवलंबून असते. यंदा भात शेतीत आलेले आवण लावणी योग्य झाल्याने बहुतांश शेतकर्यांनी आपल्या शेतात नांगरणी करुन मातीची फोड देखील करून ठेवली होती.केलेली फोड बेर पाऊस नसल्याने संपूर्ण सुकून गेली होती तर काही ठिकाणी पाण्याअभावी भाताचीरो पेपिवळी पडू लागली तर काही जणांनी हंड्या ने पाणी आणून रोपे जगवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुन्हा रोपे तयार करावी लागणार कि काय या चिंतेत शेतकरी होता. काही शेतकऱ्यांना शेतात असणाऱ्या पाण्यामुळे पानवल भागातील शेती लावून आटपत आली परंतु वरकस जमीन मालक अक्षरशः आभाळाकडे डोळे लावून वाटपहात होता. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे लावणीची कामे खोळंबली होती. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज दुपारपासून तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे आता शेतामध्ये पाणी तुंबून शेतकर्यांना लावणी करणे शक्य होणार आहे. जवळपास १५ दिवस पावसाने दडी पावसाने दडी मारल्यामुळे कडक ऊन पडत होते.त्यामुळे हवेत उष्ण ते चे प्रचंड प्रमाण वाढले होते. आज दुपार पासून पावसाने मुसळधार सुरुवात केल्यामुळे हवेत चांगल्या प्रमाणात गारवा आला आहे. उष्णतेने त्रासलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तर काहिसा बळीराजा सुखावला आहे. सतत पाऊस कायम राहीला तर शेेेतकरी भात लावणीतून मोकळा होईल.
Post a Comment