कालिदास दिना निमित्त पार पडली श्लोक पठण स्पर्धा


महाकवी कालिदास दिनानिमित्त साहित्यसंपदा आयोजित श्लोक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती  .महाराष्ट्रातील विविध भागांतून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विविध वयोगटातील बालकांनी आपला सहभाग नोंदवताना पारंपरिक वेषभूषेतून श्लोकांचे पठण केले .
   साहित्यसंपदा आयोजित संस्कारसंपदा  उपक्रमाच्या माध्यमातून मुलांवर बालसंस्कार करण्यासोबत त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो .मराठी भाषा संवर्धन व्हावे आणि सृजन समाज निर्मितीसाठी मुलांना मराठी साहित्याचे धडे दिले जातात .
मागे पडत चाललेली संस्कृती जपली जावी ह्या उद्देशाने वंदना मत्रे आणि सलोनी बोरकर मार्गदर्शक म्हणून विनामूल्य रोज मुलांकडून श्लोक ,प्रार्थना शिकवताना मुलांना त्यांचे अर्थ स्पष्ट करतात .
  श्लोक पठण स्पर्धा तीन वेगळ्या वेगळ्या वयोगटानुसार पार पडली .गझलकार रवींद्र सोनावणे ,लेखक कवी संदीप बोडके ह्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले .मुलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून  आपल्या प्रतिभेला वाव द्यावा असे मत निमंत्रित कवयित्री माधुरी चौधरी आणि वैशाली कदम ह्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीला लेखक कवी पत्रकार श्रीनिवास गडकरी ह्यांनी "प्रभावी भाषण कसे करावे " विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .भाषणांचे विविध प्रकार समजवताना उत्तम वक्ता होण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीची ओळख मुलांना करून दिली .विजेत्या मुलांचे अभिनंदन करताना सहभागी मुलांच्या पालकांचे कौतुक नमिता जोशी ह्यांनी केले .अश्या स्पर्धांतून मुलां मध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो असे सांगताना किसन पेडणेकर ह्यांनी मुलांनी अधिकाधिक वाचन करावे असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रम समन्वयक म्हणून स्मिता हर्डीकर ह्यांनी काम पाहिले .जिल्हा परिषदे मधील शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग कौतुकास्पद असून ,आपल्या कक्षा रुंदावत मुलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मोहर उठवावी असे आवाहन चित्रलेखा जाधव ह्यांनी करताना मुलांचे कौतुक केले .  
आभार प्रदर्शन संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी मानताना आगामी बालसाहित्यसंमेलनाची घोषणा केली .
पालकांनी आयोजित उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना आगामी काळासाठी योग्य मूल्यांची जपणूक करण्यास प्रोत्साहित करावे असे मत व्यक्त केले .
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या साहित्यसंपदा समूहाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा