श्री धावीर महाराजांच्या नवीन पालखीचे विधीवत पूजन


 रोहा प्रतिनिधि 

रोह्याचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री धावीर महाराजांची नवीन चांदीची पालखी बनविण्यात आली आहे. या पालखीचे 11 जुलै रोजी  विधवीत पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाचे मोजकेच पदाधिकारी मंदिरात उपस्थित होते.

श्री धावीर महाराज हे रोहेकरांचे श्रद्धास्थान आहेत. महाराजांसाठी नव्याने चांदीची पालखी बनविण्यात आली असून गेली काही महिने चांदीची पालखी बनविण्याचे काम सुरू होते. पालखी पूजनाचा कार्यक्रम भव्यदिव्य स्वरुपात करण्याचा भक्तगणांचा मानस होता. मात्र सध्या कोरोनाचे संकट असल्याने, शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करीत हा कार्यक्रम छोट्या स्वरुपात करण्यात आला.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात ट्रस्टचे व उत्सव समितीचे काही मोजके पदाधिकारीच मंदिरात उपस्थित होते. रोहेकरांना हे अनमोल क्षण पाहता यावे आणि ग्रामदेवतेचे दर्शन घेता यावे, यासाठी पालखी पूजनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ‘श्री धावीर महाराज की जय’ या फेसबुक पेजवर करण्यात आले होते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा