टीम म्हसळा लाईव्ह
मुरुड तालुक्यातील काशिद येथे असलेल्या एक जुना पुल कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडली. या अपघात दोन दुचाकी आणि एक चार चाकी पुलावरुन खाली पडली. यात एकाचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे.
विजय चव्हाण असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून तो मृरुड येथे राहणारा असल्याचे समजते. काशिद इथला जुना पूल आज कोसळल्याची खबर सर्वत्र पसरली. या पुलावरुन प्रवास करणारी एक दुकाची आणि एक चार चाकी अशा दोन गाड्या खाल पडल्याचे गावकर्यांना समजले. दुचाकी आणि चारचाकीमधील सर्व प्रवशी सुखरुप असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून कळवण्यात आले.
मात्र गावातील काही तरुण नदी पात्रातून पाहत पुढे गेले असता त्यांना तिसरी दुचाकी पडलेली आढळून आहे. त्यामुळे एक नाही दोन दुचाकी खाली कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या दुचाकी स्वारांचा शोध सुरु केला असता एक मृतदेह आढळून आला. विजय चव्हाण असे त्याचे नाव असून तो मुरुड येथे राहणार आहे.
दरम्यान, अलिबाग-मुरुड रस्त्यावर काशिद बीच ते काशिद दरम्यान गेली पन्नास वर्षे जूना असलेल्या पूलाची दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात वेळप्रसंगी केव्हाही पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामपंचातीने केली होती. मात्र तिकडे दुलर्क्ष केल्याने आज एकाला जीव गमवावा लागला आहे.
मुरुड-साळाव रस्त्यावरील काशिद येथील उघडीवरील पूल पडला असून मुरुडला जाणारी वाहतूक बंद झाली आहे. एक वाहन पडले असून ते काढण्यात येत आहे. मुरुडला जाणारी वाहने साळाव मार्गे सूपेगाववरून वळवण्यात आली आहे.
कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रायगड अलिबाग
Post a Comment