तालुक्यात 210 मि.मी तर जिल्ह्यात सरासरी 80 मि.मी. पावसाची नोंद



टीम म्हसळा लाईव्ह
 रायगड (Raigd) जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 80.76 मि.मी इतक्या पावसाची नोंद (Rainfall record) झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1178.52 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. 
     आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-
      अलिबाग- 68.00 मि.मी., पेण- 2.00 मि.मी., मुरुड- 348.00 मि.मी., पनवेल- 0.00 मि.मी., उरण-1.00 मि.मी., कर्जत- 0.50 मि.मी., खालापूर- 14.00 मि.मी., माणगाव- 74.00 मि.मी., रोहा- 49.00 मि.मी., सुधागड-20.00 मि.मी., तळा- 131.00 मि.मी., महाड- 67.00 मि.मी., पोलादपूर- 92.00 मि.मी, म्हसळा- 210.00 मि.मी., श्रीवर्धन- 214.00 मि.मी., माथेरान- 1.60 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 292.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 80.76 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 37.50 टक्के इतकी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा