तळा -किशोर पितळे
पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे.जिल्ह्यामध्येएचडीएफसी इर्गो या कंपनीमार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या प्रचार-प्रसारासाठी तळा तालुक्यामध्ये आलेल्या कृषीरथाचे उद्घाटन मा.पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मा. गीताताई जाधव, पंचायत समिती सभापती मा.अक्षराताई कदम, जिल्हा परिषद सदस्य मा. बबन चाचले, उप सभापती गणेश वाघमारे, उप विभागीय कृषी अधिकारी श्री. सतीश बोराडे, तहसीलदार अण्णापा कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, एच.डी.एफ.सी. इर्गो विमा कंपनी प्रतिनिधी राजेश गायकवाड, कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या रामचंद्र दगडू मोरे तळा, नामदेव शंकर वाजे कासेवाडी या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनेचे सहभाग प्रमाणपत्र मा.पालकमंत्री यांच्या हस्ते देण्यात आले. हा प्रचाररथ तळा तालुका बरोबरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावोगावी जाऊन योजने बाबत प्रचार प्रसिद्धी करणार असल्याची माहिती सतीश बोराडे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिली. मागील वर्षी कापणी झालेल्या भात व नाचणीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील १०३ शेतकऱ्यांना ६.७५ लक्ष इतकी नुकसानभरपाई मिळाल्याचे परंतु भात हे जलप्रिय पीक असल्याने स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी मर्यादा येत असल्याची माहिती सागर वाडकरतालुकाकृषीअधिकारीयांनीदिली.मा.पालक मंत्री म्हणाल्या कि सध्या हवामानाची शाश्वतीराहिलेली नाही केव्हा अती पाऊस पडतो तर काही वेळा पावसामध्ये खंड पडतो मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या भात व नाचणी पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.त्यामुळे अशापरिस्थितीमध्येशासनाची ही योजनाशेतकऱ्यांच्या हिताची असून जिल्ह्यातीलजास्तीत जास्तशेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.
Post a Comment