श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर
रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांचा ६६ वा वाढदिवस श्रीवर्धन शहरात अनोख्या पद्धतीने श्रीवर्धन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोणीही शुभेच्छां करिता सुतारवाडीमध्ये येऊ नये असा आदेश सुनील तटकरे यांनी दिल्याने आदेशाचे पालन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय मधील रुग्णांना पाणी बॉटल, अंडी व बिस्किट अशा खाद्य स्वरूपातील वस्तूंचे वाटप केले. त्याचसोबत महावितरणमधील तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना वाढदिवसानिमित्त रेनकोटची वाटप करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला व साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. सदरच्या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी अमित शेडगे, नायब तहसीलदार विपुल ठुमे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महंमद मेमन, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नीलेश येलवे, सिद्धेश कोसबे, गणेश पोलेकर, राजेंद्र भोसले, अनिकेत मोहीत, अमेय कोसबे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment