म्हसळा तालुक्याचे विकासाचे शिरपेचात मानाचा तुरा, पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण
म्हसळा -प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत म्हसळा तालुका सावर येथे उभारण्यात आलेल्या भव्य क्रीडा संकुलाचे (Sports Complex) उद्घाटन रायगड जिल्हा पालकमंत्री ना. आदिती तटकरे (Guardian Minister Aditi Tatkare) यांचे शुभ हस्ते करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने म्हसळा नगर पंचायत सावर गावाचे हद्दीत शासनाचे रिक्त जागेत तालुका क्रीडा संकुल समिती म्हसळा द्वारे भव्य संकुल उभारण्यात आले आहे या क्रीडा संकुलाचे बांधकामासाठी एक कोटींचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.म्हसळा तालुका क्रीडा संकुल लोकार्पण करण्याचा योगायोग म्हणजे खासदार सुनिल तटकरे साहेब यांचा 10 जुलै रोजी वाढदिवस आणि याच दिवशी म्हसळा तालुक्याचे विकासाचे शिरपेचात एक नवीन भव्य क्रीडा संकुलाची भर पडुन म्हसळा तालुक्याचे वैभवात वाढ झाली असल्याचे उदघाटन कार्यक्रमाला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.या कामी म्हसळा शहर व तालुक्यातील ग्रामस्थांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणी आणि सहकार्याने आपल्याला तालुक्यात चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल उभारता आले आहे या संकुलात सातत्याने वेगवेगळ्या खेळांची स्पर्धा आयोजित करून संकुलाची जोपासना ठेवता आली पाहिजे. संकुलामधुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार व्हावेत अशा शुभेच्छा देताना तालुक्यातील खरसई येथील हेमंत पयेर,हरिदास भायदे, उत्तम मांदारे,हर्षदा म्हसकर, हेमा मेंदाडकर,गीता मेंदाडकर या खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत भाग घेत आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक केले आहे.म्हसळा तालुक्यातील मैदानी खेळ खेळण्यासाठी याच क्रीडा संकुला समोर खो-खो, कबड्डी आदी खेळांचे क्रीडांगण तयार करण्यासाठी काही अवधीतच दीड कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे पालकमंत्री तटकरे यांनी आश्वाशीत केले.माझ्याकडे राज्याचा क्रीडा खाता आहे परंतु गेल्या वर्ष,दोन वर्षात कोरोना कालावधीत शासनाकडून आवश्यक तेवढा निधी क्रीडासाठी आणता आला नसला तरी आता या कामात भरारी घेतली जाईल असे सांगितले. म्हसळा तालुका क्रीडा संकुल आता जरी शहरापासुन थोडे दुर वाटत असेल तरी शहराचे विस्तार पहाता या संकुलाला राज्यात चांगला दर्जा मिळेल अशा सर्व त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
आयोजित कार्यक्रमात वूडबॉल, बॅटमिंटन, स्केटिंग आदी खेळात प्रावीण्य मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हेमंत पयेर यांनी भाग घेऊन भारत देशाचे नाव लौकिक केल्याने त्यांचा पालकमंत्री तटकरे यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमात तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, प.स.सदस्य मधुकर गायकर,माजी सभापती उज्वला सावंत, क्रीडा उपसंचालक संजय महाडीक, प्रांतअधिकारी अमित शेटगे, तहसीलदार के.टी.भिंगारे, जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर,तालुका क्रीडा अधिकारी संदीप वांजळे,उपकार्यकारी अभियंता गणगणे, जेष्ठ नेते अंकुश खडस, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, शाहिद उकये, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, शहराध्यक्षा शगुप्ता जहांगीर, शाहिद उकये, गण अध्यक्ष सतीश शिगवण, अनिल बसवत, किरण पालांडे, गजानन पाखड, संजय कर्णिक, चंद्रकांत कापरे, संतोष नाना सावंत,म हेश घोले, शेखर खोत, सरपंच अनिल जोशी, सरपंच वनिता खोत, लहूशेट म्हात्रे, करण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी केले.
Post a Comment