( फोटो - म्हसळा प्रेस क्लबच्या माध्यमातून खासदार तटकरे यांचा सत्कार करताना )
म्हसळा प्रतिनिधी
रायगड प्रेस क्लब आयोजित म्हसळा तालुका आदर्श शेतकरी पुरस्कार 2021, म्हसळा तालुका प्रेस क्लबच्या वतीने कणघर येथील आदर्श शेतकरी धनंजय सावंत आणि पाष्टी येथील आदर्श शेतकरी जीवन लाड यांचा सत्कार रायगड जिल्हा लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते "आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.
रायगड प्रेस क्लबचे दिवंगत पत्रकार संतोष पवार यांनी सन 2013 पासुन रायगड जिल्ह्यात "सन्मान शेतकऱ्याचा, अभिमान महाराष्ट्राचा' या संकल्पनेतुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी राजाचा त्याच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्यात येतो.याच अनुषंगाने मौजे कणघर येथे संपन्न या कार्यक्रमाला अलि शेट कौचाली, तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषदचे कृषी पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती छायाताई म्हात्रे, उपसभा पती संदीप चाचले, माजी सभापती उज्वला सावंत, सरपंच श्रीपत धोकटे, पत्रकार संजय खांबेटे, प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत शिर्के, तहसीलदार शरद गोसावी,नायब तहसील दार के.टी.भिंगारे, मंडळ कृषी अधिकारी सुजय कुसाळकर, माजी सरपंच संतोष सावंत, पत्रकार उदय कळस, सचिव महेश पवार, श्रीकांत बिरवाडकर, वैभव कळस, गणेश म्हाप्रळकर, लेपचे सरपंच अंकुश खडस, बाळकृष्ण सावंत,शाहिद उकये, बागायतदार फैसल गीते,रविंद्र सावंत, सतीश शिगवण,अनिल बसवत, पंच क्रोशीतील शेतकरी, सरपंच उपस्थित होते.
खासदार तटकरे यानी प्रेस क्लबच्या कार्यक्रमातील अभिप्रेत शेतकरी सत्कार याला महत्व व स्थानिक पत्रकारांचे प्रेम याची सांगड घालून ससंद आधिवेशनाचे पूर्व संधेला बिझी शेड्यूल मध्ये विषयाला गांभीर्य देऊन सन्मान शेतकऱ्याचा, अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाला मी आवर्जुन उपस्थित राहीलो पुढील वर्षीही मी अशा कार्यक्रमाला आवर्जुन येणार आहे असेही सांगितले या कार्यक्रमाचा कृषी सभापती मनवे व स्थानिक पत्रकारानी सांख्यिकी दृष्टीने तालुक्याचे भविष्यातील कृषी विषयक धोरण ठरविणे मला अभिप्रेत आहे.आवश्यकता असेल जिल्हा परिषद कृषी, राज्याचा कृषी विभाग पशुसंवर्धन व दुग्धविकास, मस्योत्पादन, बाळासाहेबसावंत विद्यापिठ दापोली या सर्वांचा सहभाग घेऊन पत्रकार व सर्वाना समवेत घेऊन श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यासाठी कृषीविषयक मास्टर प्लॅन तयार करा असा खासदार तटकरे यानी कृषी सभापती मनवे व उपस्थिताना सल्ला दिला. याच वेळी श्रीवर्धनच्या आमदार व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे आसणाऱ्या फलोत्पादन खात्याचीही फार मोठी मदत होणार आहे असे आवर्जुन सांगितले.प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवसायिक स्वरूपाची शेती केल्यास परिवाराला रोजगार तर मिळेलच त्याच बरोबर स्वतःला आर्थिक स्वावलंबी होता येईल.शेतीवर अनेक कुटुंबाना रोजगारही देता येईल.कोकण परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यास येथील वातावरण पोषक असल्याने आजकाल अनेक तरुण वडिलोपार्जित शेती व्यवसायाकडे वळले आहेत याचा मनात खुप आनंद होतो. याच वेळी शेतकऱ्यानी काळानुरूप बदलती व्यवस्था स्विकारून रोजगार हमी योजना माती परिक्षण अशा नव-नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आसल्याचा मौलिक सल्ला खा. तटकरे यानी दिला.
"खासदार तटकरे यानी म्हसळा तालुक्या तील पाभरे येथील आंबा बागायतदार फैसल गीते हे जुन्या नविन आंबा बागायतीं ना देखभाल करून किड, खत आणि पाणी व्यवस्थापनाचे माध्यमातून भरघोस पिका खाली आणतात हे सांगून कौतुक केले"
Post a Comment