म्हसळा तालुक्यात आज १५ रुग्ण कोरोना बाधीत : ८३४ रुग्णानी केली कोरोनावर मात.


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात आज १५ रुग्ण कोरोना बाधीत झाले आहे. म्हसळा तालुक्याची बाधीत रुग्णांची संख्या हजारीकडे वाटचाल करीत असून ती ९३५ आहे, कोरोनावर आज पर्यंत८३४रुग्णानी यशस्वी मात केली आहे.कोरोनामुळे आजपर्यंत तालुक्यातील ४७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे, त्याचे प्रमाण ५% आहे.
    आजचे१५ बाधीतरुग्णांना मध्ये म्हसळा नगरपंचायत हद्दीतील ६, तालुक्यातील ग्रामिण भागातील ९आसल्याचे तालुका आरोग्य आधिकाऱ्यानी कळविले आहे. हे रुग्ण मरीयामखार,खामगाव,मेंदडी आणि रोहीणी येथील आहेत.५४ बाधीतांपैकी ४२घरच्या घरी विलगीकरण (Home Isolation), १रुग्ण उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन,१उपजिल्हा रुग्णालय अलिबाग,८
रुग्ण ग्रामिण रुग्णालय, म्हसळा, २रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

"म्हसळा तालुक्यातील कोव्हीडचे प्रमाण शहरांत तेवढेच ग्रामिण भागातून आहे. कोव्हीडचे तीसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड टेस्टींग मध्ये केलेली वाढ ही सुद्धा उपाययोजनांचा भाग आहे.म्हसळाकर नागरिकानी मास्क, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे नियमीत पालन करावे. अनावश्यक गर्दी टाळावी."
शरद गोसावी, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा