रोह्यातील सुप्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी समुपदेशन याची योग्य सांगड घालत रोह्यातील रुग्णांची गेले काही वर्ष तनाबरोबर मनाचीही चिकीत्सा करणाऱ्या डॉ. कांचन सचिन कदम यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम त्यांना म्हसळा लाईव्ह कडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
अचुक निदान, त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार आणि रुग्णांचे त्यांच्याकडून केले जाणारे प्रभावी समुपदेशन यामुळे अल्पावधीतच रोहे शहर आणि परिसरात त्वचाविकार, केसगळती, ओबेसिटी मैनेजमेंट, सौंदर्य टीप्स या विषयात डॉ. कांचन कदम यांचे कदम वेलनेस क्लिनिक रुग्णांचे विश्वसनीय केंद्र बनले तिथे मिळणारी उत्तम वैद्यकीय सेवा आणि निरामय आरोग्याचा मुलमंत्र ,जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी त्या नेहमीच देत असलेला बुस्टर यामुळे तनाबरोबर मनाचीही चिकीत्सा करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून अव्याहतपणे होत आहे.
डॉ. कांचन कदम यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी असून एक सुप्रसिद्ध डॉक्टर, व्यवसाय, संसार, याचा व्याप सांभाळूनही मिसेस महाराष्ट्र रेजिना 2019 चा मानाचा किताब प्राप्त करणाऱ्या एक तरुणाईच्या आयडॉल, आपले व्यवसायिक व्याप सांभाळून आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ आणि योगदान देणाऱ्या एक कुटुंबवत्सल ग्रुहीणी,रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय क्लबच्या माध्यमातून रोह्यात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन आपले सक्रीय योगदान नोंदवणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या, आपल्या अभ्यासपुर्ण वक्तृत्वाने आणि लिखाणाने प्रभावी जनजागृती करणाऱ्या उत्तम लेखक आणि वक्ता असे अनेक आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत.युवकांनी नेहमीच अत्यंत कष्ट करून, जिज्ञासू व्रुत्ती ठेवून नवनवीन गोष्टी आणि आधुनिक तंत्र आत्मसात केले पाहीजे असा नेहमीच त्यांचा आग्रह असतो.
"उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेस सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय बांधता येईल कधीही
क्षितिजापालिकडे झेप घेण्याची जिद्द असावी"
या ओळी आपल्या करियरसाठी प्रेरणादायी ठरल्याचे त्या नेहमीच सांगतात.
त्यांचे निर्मळ आणि संवेदनशील मन त्यांना सामाजीक कार्याकडे आधिकाधिक प्रोत्साहित करत असून गेले दोन महीने कोरोना संबंधी सोशल मीडिया आणि प्रिंट मिडीयाच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये यासंबंधी अभ्यासपुर्ण विवेचन करत असून त्यांच्या लिखाणाला वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
गेले एक वर्षापासून नवभारत टाईम्सचा रायगड जिल्ह्यातील बेस्ट ओबेसिटी आणि ट्रायकोलॉजी सेंटर हा बहुमान प्राप्त केलेले डॉ .कांचन सचिन कदम यांचे कदम वेलनेस क्लिनिक अत्याधुनिक सोयीसुविधांनी आधिक सुसज्ज झाले असून नव्या दमाने नव्या उत्साहाने कै. काकासाहेब गांगल मार्गावरील केतकी अपार्टमेंट रोहा येथील पहिल्या मजल्यावर रुग्णसेवा ,रुग्णसमुपदेशन आणि नवीन थेरपी साठी सज्ज झाले आहे. येथील सकारात्मक वातावरण रुग्णांच्या तनाला आणि मनाला नक्किच नवीन उभारी देत आहे.
वाढदिवसानिमित्त त्यांना पुनश्च शुभेच्छा व्यक्त करून त्यांना निरामय स्वास्थ आणि उदंड आयुष्य लाभावे ही ईश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना करतो .
Post a Comment