वाढदिवस विशेष : सर्व धर्मियांचे स्फूर्ती स्थान धर्मनिरपेक्षतेचे खरेपाईक आपले सुनील तटकरे साहेब


शब्दांकन : विजय गिरी श्रीवर्धन 

साहेबांचे असलेले प्रसन्न व्यक्तिमत्व, नेहमी हसरा चेहरा यामुळे कोणीही कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक त्यांच्या भेटीसाठी गेल्यावर साहेब त्याच्याजवळ व्यवस्थित सन्मानाने बोलतात. ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. जुन्या घोणसे घाटामध्ये ठाणे दिवेआगर एसटी बसला अपघात झाल्यानंतर जवळजवळ बावीस प्रवासी मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर या अतिशय धोकादायक असलेल्या जुन्या घाटाला पर्यायी मार्ग करण्यासाठी साहेबांनी अतिशय मेहनत घेतली. पर्यायी मार्ग काढण्यासाठी असलेली जमीन वनखात्याची असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. परंतु साहेबांनी सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करून घेतला. श्रीवर्धन शहरातील अनेक सण-उत्सव यासाठी साहेब नेहमीच तत्परतेने हजर राहत असतात. मग मुस्लिम धर्मीयांची ईद असो किंवा इफ्तार पार्टी असो यासाठी देखील साहेब नेहमी त्या ठिकाणी उपस्थित असतात. तसेच श्रीवर्धन शहरातील गोकुळाष्टमी हा अतिशय प्रसिद्ध असा उत्सव मानला जातो. यावेळी देखील साहेब स्वतः आवर्जून उपस्थित राहतात व नाचणाऱ्या गोविंदा मध्ये हातात गदा घेऊन स्वतः देखील नाचतात. त्याचप्रमाणे गणेश उत्सव, दिवाळी अशा वेळी देखील श्रीवर्धन मध्ये उपस्थित राहून या ठिकाणच्या नागरिकांना शुभेच्छा देतात. कश्मीर मधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या वाहनावरती  फिदायीन हल्ला झाला होता. त्या वेळेला श्रीवर्धनमध्ये हिंदू-मुस्लिम  समाजानी शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी देखील तटकरे साहेबांनी आपली उपस्थिती आवर्जून लावली होती. श्रीवर्धन मतदार संघातील तसेच श्रीवर्धन तालुक्यातील कोणत्याही नागरिकांच्या सुखदु:खा मध्ये ते नेहमीच हजर असतात.म्हणूनच साहेब सर्व धर्मियांचे हृदय सम्राट आहेत 

रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार

व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यापासून केली. त्यानंतर ते रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविण्याची संधी मिळाली. त्याचवेळी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्यानंतर रोहा माणगाव मतदारसंघातील तत्कालीन आमदार लोकनेते अशोक दादा साबळे यांच्या जागी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने रोहा माणगाव विधान मतदान संघातून उमेदवारी दिली व सुनील तटकरे यांनी ही निवडणूक अत्यंत सहजपणे जिंकली. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे होते. तटकरे साहेब जरी विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले असले तरी त्यांनी या काळात अनेक राजकीय बारकावे शिकून घेतले. त्यानंतर 2009 च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्या अगोदर राज्य मतदार आयोगाने लोकसंख्येच्या आधारावरती मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. मतदार संघाची पुनर्रचना जाहीर झाल्यानंतर रोहा माणगाव मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यातून गायब झाला होता. पूर्वीचा जुना असलेला श्रीवर्धन मतदारसंघ हा श्रीवर्धन, म्हसळा व मुरुड या तालुक्यात पुरताच मर्यादित होता. परंतु मुरुड तालुका अलिबाग मतदारसंघाला जोडला गेल्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये श्रीवर्धन, म्हसळा, संपूर्ण तळा तालुका त्याचप्रमाणे माणगाव तालुक्यातील काही भाग व रोहा मंडळ विभागातील भाग जोडण्यात आला. त्यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आपल्या राजकीय डावपेचांमध्ये मातब्बर असलेले सुनील तटकरे साहेबानी निवडणूक तिकीट मिळाल्यानंतर तळागाळातील लोकांशी जाऊन थेट संपर्क केला जनतेचा विश्वास जिंकून शिवसेनेचे उमेदवार तुकाराम सुर्वे यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. महाराष्ट्रात बहुमताने निवडुन आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार  स्थापन करण्यात आले होते. त्यावेळी तटकरे साहेबाना मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांनी राज्याचे उर्जा मंत्री व अर्थमंत्री पद अतिशय चांगल्या पद्धतीने भूषविले. त्याअगोदर ते रोहा माणगाव मतदारसंघातून आमदार निवडून गेल्यानंतर त्यांना नगर विकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. श्रीवर्धन मतदारसंघाकडे देखील साहेबांचे लक्ष नेहमीच होते नगर विकास राज्यमंत्री असताना त्यांनी श्रीवर्धन तालुक्यांमध्ये अनेक विकास कामे आणली. 2009 साली श्रीवर्धन मतदार संघातून निवडून आल्यानंतर नामदार तटकरे साहेबानी अर्थमंत्री असताना श्रीवर्धन मतदारसंघासाठी भरघोस निधी आणला. यावेळी 14 कोटी रुपये खर्च करून श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरती सुशोभित असा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. 752 किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवरती कुठेही अशा प्रकारचा बंधारा आपल्याला पाहायला मिळत नाही. तो फक्त आहे श्रीवर्धन समुद्र किनार्‍यावरच. त्यानंतर तटकरे साहेबांनी श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होती. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यांच्या कामाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले. श्रीवर्धन शहरात देखील सर्व रस्ते चकाचक करण्यात आले व श्रीवर्धन शहराच्या विकासासाठी देखील भरघोस निधी साहेबांनी आणला होता. त्यानंतर 2011 साली झालेल्या श्रीवर्धन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये  साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम .अनिकेत भाईंच्या कुशल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता श्रीवर्धन नगरपरिषदे मध्ये आली. नगर परिषदेमध्ये सत्ता आल्यानंतर साहेबांनी श्रीवर्धन नगर परिषदेची ब्रिटिशकालीन असलेली जीर्ण इमारतीच्या जागी नवीन भव्य प्रशाकीय इमारत बांधली .त्याचप्रमाणे श्रीवर्धनचे जुने असलेले कुटीर रुग्णालयाच्या जागी रुग्णालयाची  मोठी इमारत बांधली व त्याला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देण्यात आला.  जनसेवा करताना साहेबांना अनेक चढ-उताराचे प्रसंग देखील आले. पण त्याला सामोरे जात त्यांनी त्याच्यावर मात केली .संघर्ष आणि साहेब जणु काही समीकरणच बनले आहे .साहेबांना जनतेच्या सुखासाठी खूप संघर्ष करावा लागतो .जनतेला सुखसोयी मिळवून देण्यासाठी ते कधीही कमी पडले नाहीत त्साहेब विधानपरिषदेवर निवडून गेले. त्यावेळी देखील त्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले व त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करत श्रीवर्धन मतदारसंघासाठी भरपूर निधी आणला. त्यानंतर 2019 सली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुनील तटकरे साहेबांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2014 साठी देखील साहेबांना रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट देण्यात आले होते. मात्र त्या वेळी नाम साधर्म्य उमेदवारामुळे साहेबांना  निसटता पराभव पत्करावा लागला होता हा पराभव सर्व कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता .त्याचा वचपा काढत 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत साहेबांनी दणदणीत विजय संपादन करून आपला प्रवेश दिल्लीमध्ये केला. त्यानंतर लगेचच 2019 लाच पुना विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी त्यांनी आपली कन्या कुमारी आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. आज पर्यंत श्रीवर्धन  मतदार संघाच्या इतिहासात चाळीस हजारांचे मताधिक्य घेऊन कोणताही उमेदवार निवडून आला नव्हता. ही किमया आदिती तटकरे यांनी करून दाखवली. त्त्यानंतर महाराष्ट्र मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. यामध्ये आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्याचप्रमाणे पर्यटन व इतर अनेक विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात आपला प्रचंड दबदबा निर्माण करणारे खासदार तटकरे साहेब  यांनी रायगड जिल्ह्यासाठी अशाच प्रकारे विकास कामे करताहेत  व रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक नंबरचा क्रमांक लागेल असे कार्य करत आहेत 

कोरोना महामारीच्या व निसर्ग चक्रीवादळ काळात देखील खासदार सुनील तटकरे साहेबांचे विशेष योगदान.

 राज्यात मार्च दोन हजार वीस पासून कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व दळणवळण यंत्रणा, त्याचप्रमाणे खाजगी कंपन्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या.  नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये अशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आले होते. यावेळी श्रीवर्धन  मतदार संघात खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेतभाई यांनी विविध प्रकारच्या मदती नागरिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यानंतर तीन जुलै रोजी कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. यामध्ये सर्वात जास्त नुकसान श्रीवर्धन तालुक्यामध्ये झाले. कारण वादळ किनाऱ्याला धडकण्याचे ठिकाण श्रीवर्धन व हरेश्वरचा समुद्रकिनारा हेच होते. वादळ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेतभाई यांनी श्रीवर्धन तालुक्याचा दौरा केला. सर्व ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू होता. यावेळी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांना अन्नधान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शरद पवार यांनी श्रीवर्धनची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळ बैठक घेऊन श्रीवर्धन तालुक्यासाठी जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करून पाठपुरावा केला त्यानुसार तालुक्यासाठी व रायगड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला .श्रीवर्धन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर निर्माण करून सेंट्रल ऑक्सिजन पुरवठा, ड्यूरा सिलेंडर सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्याच प्रमाणे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी वर्ग यांची देखील अतिरिक्त भरती करण्यात करून घेतली ,आराठी येथे आयसोलेशन सेंटर उभे केले त्याप्रमाणे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयासाठी कारडीयाक अंबुलन्स ,पेशंट ट्रान्फर ऍम्ब्युलन्स ,एक्सरे मशिन्स देखील उपलब्ध केली कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या करिता साहेब स्वतः नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करत असतात ,तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून माहिती घेऊन उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देऊन प्रत्यक्ष पाठपुरावा घेतात नागरिकांशी वेळोवेळी संपर्क साधतात ,रात्री अपरात्री कोणीही साहेबाना कॉल केला तर अशावेळी अत्यावस्थ रुग्णांना मोठ्या शहरात बेड उपलब्ध करून पेशंट ऍडमिट झाल्यानंतर डीचार्ज होईपर्यंत पाठपुरावा घेतात ,साहेबांसोबत पालकमंत्री नाम अदितीताई व आमदार अनिकेतभाई पूर्ण ताकतीने जनसेवा करीत आहेत .साहेबांबद्दल काय लिहावे शब्दच अपुरे पडतात .साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 

विजय गिरी श्रीवर्धन 9822083027



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा