तळा - किशोर पितळे
तळा व मुरुड तालुक्याला जोडणारा राजपुरी खाडी वरील मांदाड येथील पूल धोकादायक स्थितीत असून मांदाड पुलाची वेळीच उपाय योजना न केल्यास महाडच्या सावित्री पुला सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे नाकारता येत नाही असे शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांनी केले आहे.शहरातील शेकाप संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.या प्रसंगी युवानेते लहू चव्हाण व ज्ञानेश्वर भोईर तसेच शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.तळा व मुरुड तालुक्याला जोडणारा मांदाड पूल हा बॅ.अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आला होता.परंतु या पुलाला मोठं मोठ्या भेगा पडल्याअसल्याने पूल धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.दिघी पोर्टचे काम चालू असल्याने मोठ्या प्रमाणावर ओव्हर लोड मालाची वाहतूकहोत असते तसेच वाळू वाहतूक या खाडीतून होत असल्याने वाळूनी भरलेले ट्रक जाताना संपूर्ण पुल व्हँब्रेशन होत आहे तर काही ठिकाणी पुलाला तडे गेलेले दिसून येत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हादरे बसले असूनभेगा पडल्या आहेत.तरीसार्वजनिक बांधकाम विभाग मुरूड यांनी या पुलाचे स्ट्रक्चरल आँडीट करावे तालुक्यातील संगम पुलाची उंचीची मागणी देखील केली आहे. याबाबत मा.जिल्हाधिकारी रायगड, मा.प्रांताधिकारी माणगांव, मा.तहसीलदार तळा सार्वजनीक बांधकाम विभाग मुरूडनिवेदन यांना सादर केले आहे.आमच्या मागण्या असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शेतकरी कामगार पक्षा तर्फे मांदाड पुलावर उपोषणकरण्यात येईलअसा इशाराही यावेळी धनराज गायकवाड यांनी दिला.
Post a Comment