सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानची कार्यकारिणी जाहीर



रोहा (वार्ताहर)

रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श युवा संस्था हा मानाचा पुरस्कार प्राप्त केलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच शासकीय विश्रामगॄह रोहे येथे सुराज्यचे संस्थापक अध्यक्ष रोशन चाफेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


यावेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष म्हणून मयूर धनावडे,सचिव हाजीमल कोठारी,खजिनदार किरण कानडे,उपाध्यक्ष अभिजित भोसले,सह सचिव विनीत वाकडे,सह खजिनदार सौरभ भगत,सल्लागार हर्षवर्धन पाटील,सह सल्लागार कमलेश चांदोरकर,कायदेविषयक सल्लागार अंकित बंगेरा,संपर्क प्रमुख शुभम पतंगे,सह संपर्क प्रमुख परेश चितळकर,सोशल मीडिया प्रमुख निखिल जंगम,सोशल मीडिया सह प्रमुख कुणाल आंबळे यांची निवड करण्यात आली तसेच त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

यावेळी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या रोहा तालुका अध्यक्ष पदी सुमित खरात,उपाध्यक्ष पदी सुमित कडु,सचिव पदी मोनिष भगत,सह सचिव पदी अथर्व लोहार यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

रोहे शहर अध्यक्ष पदी वेदांत देशमुख,उपाध्यक्ष पदी तुषार दिघे,सचिव पदी संकेत देसाई,सह सचिव पदी सागर जाधव तर वरसे विभाग अध्यक्ष म्हणून श्रेयस सोनावणे,खारापटी विभाग अध्यक्ष राहुल पोकळे,धाटाव विभाग अध्यक्ष अनिकेत पाशिलकर,कोलाड विभाग अध्यक्ष आकाश भिंगारे,मालसई विभाग  अध्यक्ष शुभम मोहिते ,सोनगाव विभाग अध्यक्ष रूतिक शेलार,पिंगळसई विभाग अध्यक्ष सागर जाधव,साळाव विभाग अध्यक्ष महेंद्र कांबळी यांची निवड जाहीर करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष रोशन चाफेकर यांनी शुभेच्छा दिल्या व संस्थेचे सक्षम कार्य समाजासाठी हे ब्रीद लक्षात ठेवत सगळ्यांनी आधिक जबाबदारीने व जोमाने कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा