धक्कादायक : मेंदडी येथे दुर्घटना ४२ वर्षीय माच्छिमार गेला वाहून ; शोधकार्य सुरु


म्हसळ्यात पावसाची संततधार सुरु : मेंदडी येथे दुर्घटना ४२ वर्षीय माच्छिमार गेला वाहून. शोधकार्य सुरु

संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा तालुक्यात काल पावसाची संततधार सुरु होती, दिवसभरात १५९ मि.मि पावसाची नोंद झाली. तालुक्यात आजपर्यंत २२६७ मि.मि. पावसाची नोंद झाली. काल सकाळी १०.३०च्या सुमारास सुरेश हरेश पायकोळी वय ४२ व शशीकांत लक्षण पाटील वय ४९ हे दोघेही खाडी लगत नांगरून (बांधून)ठेवलेली छोटी बोट खाडीत वाहून जातआसल्याचे लक्षात आल्याने ती वाचवाला जात असताना "गावखार" भागात पाण्याच्या घावात अडकले , शशीकांत प्रयत्नांची शर्थ करून किनाऱ्या लगत आला तर सुरेश लागूनच आसलेल्या राजपुरी खाडीत वाहून गेला आसावा असा अंदाज आहे.मेंदडी येथील स्थानिक कोळी बांधवानी जवळपासच्या ठिकाणी शोधकार्य सुरू केले.पावसाचा जोरदार मारा व काळोखी मुळे शोधकार्य काल रात्री उशीरा थांबले, आज सकाळ पासूम महाड येथील "साळुंखे रिस्क्यू ऑपरेशन" टीमचे माध्यमातून शोध कार्य अद्यापही सुरु आहे. तहसीलदार शरद गोसावी,नायब तहसीलदार के.टी.भिंगारे, सपोनी उध्वव सुर्वे, मंडळ अधिकारी सलीम शहा, दत्ता कर्चे, ग्रामसेवक मच्छींद्र पाटील, तलाठी गीऱ्हे , पो.ना.संतोष चव्हाण,  ही मंडळी स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी शोध कार्याला मदत करीत आहेत.
  तुफानी पाऊस व वाऱ्यामुळे संदेरी येथील २ घरांच्या भिंती आणि अंगणवाडीचे शौचा लय कोसळले, यामध्ये केरू धाकू नगरकर यांच्या घराचे पडवीची भिंत अंदाजे ४ते ५ हजार,रमेश पाष्टे यांच्या घराची भिंत पडून सुमारे रु२२ हजाराचे नुकसान झाले. अंगणवाडीचे शौचालय कोसळून यात सुमारे रु२५ हजाराचे नुकसान झाल्याचे स्थानिकानी सांगितले तसेच गणेशनगर (रेवली) येथील महादेव धर्मा कांबळे यांच्या वाड्याची भिंत कोसळली त्यांचेही २५ हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

फोटो १) मेंदडी येथील शोध मोहीम 

गणेशनगर (रेवली) येथील महादेव धर्मा कांबळे यांच्या वाड्याची भिंत कोसळल्याचे दिसत आहे

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा