तळा-किशोर पितळे-महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्य मंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शिवसंपर्क अभियान (Shiv Sena's Shiv Sampark Abhiyan.) लक्ष २०२२ मोहिमेचे आयोजन तळा शाखेकडून १६ जुलै रोजी करण्यात आले होते यावेळी जिल्हा प्रमुख मा.अनिलजी नवगणे,तालूका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ शहरप्रमुख राकेश वडके,संपर्क प्रमुख हरिश्चंद्र म्हातले नगरसेवक, नगरसेविका, विभाग प्रमुख, कार्यकर्ते आजी, माजी पदाधिकारी, महीला आघाडी, युवा सेना याची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते, शिवसैनिक,पदाधिकारी यांच्या समस्या जाणूक्षमन घेतल्या. त्यालवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत तळा शहरातील २५ युवकांनी नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवरपक्षात प्रवेश केला.त्यामध्ये निलेश तळेकर नेतृत्वाखाली केतन आर्डे,दिपेश तळकर,साहील तळेकर जयेश तळेकर किरण तळेकर राकेश तळकर.वैगेरे युवकांनी भगवा झेंडा खांद्यावर घेतला.व स्वागत करण्यात आले.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ.
Admin Team
0
Post a Comment