रोह्यातील सुप्रसिद्ध कॉस्मेटोलोजिस्ट,ट्रायकोलोजिस्ट तसेच ओबेसिटी कन्सल्टंट डॉ. कांचन सचिन कदम यांचा अभ्यासपूर्ण लेख
कोविड -१९ महामारीचे परिणाम सर्व जगभर दिसत आहेत. ह्या गंभीर आजाराचा प्रभाव लठ्ठ लोकांच्यात अधिक दिसत आहे. कोविड -19 च्या संसर्गमध्ये लठ्ठ व्यक्तीचा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका तिप्पट वाढू शकतो . शिवाय लठ्ठपणामुळे शरीराची रोप्रतिकारक क्षमता व फुफ्फुसांची क्षमता देखील कमी होते.आणि आपण सर्वजण हे जाणून आहोत की, रोगप्रतिकारक क्षमता आणि फुफ्फुसांची क्षमता हे कोरोना काळात किती महत्वाची आहे.
कोविड १९ अभ्यासानुसार, रुग्णालयात दाखल होणे, ICU, invasive mechanical ventilation ची गरज आणि मृत्यू ची जोखीम लठ्ठ लोकांच्यात आणि BMI अधिक असणाऱ्या लोकांच्यात जास्त आहे .BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा वाढणाऱ्या वजना सोबत वाढत जातो .
वाढतं वजन ,लठ्ठपणा ही एक चिंताजनक जागतिक समस्या बनत आहे. लठ्ठपणा हा एक आजार असून लठ्ठपणामुळे इतर अनेक गंभीर आजाराचा धोका वाढतो शिवाय कोविड १९ ह्या आजाराचा धोका देखील वाढतो . जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने व आशिया प्यासिपिक क्रायटेरिया ऑफ ओबेसिटी च्या मतानुसार भारतातील निम्मी लोक संख्या लठ्ठ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोकादायक रोगांमध्ये स्थुलपणाचा पहिल्या दहामध्ये आणि विकसनशील देशामध्ये पहिल्या पाचमध्ये क्रमांक लागतो हे देखील जाहिर केले आहे . असा हा आरोग्यामधील, लठ्ठपणा चा अडथळा दूर करण्यासाठी लोकांमध्ये लठ्ठपणा , वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी, त्या बद्दलची सर्व माहिती देऊन जनजागृती करण्याचा उपाय सूचित केला गेला आहे. शरीराचं वजन योग्य किंवा त्याला जवळपास ठेवणे अगदी आवश्यक आहे. आणि हे आटोक्यात असलेले वजनच आपल्याला नेहमी आरोग्याच्या व तंदुरुस्तीच्या मार्गावर ठेवेल.
पण सर्वात आधी वजन किती कमी करणे गरजेचे आहे ते ठरवावे लागेल. नॉर्मल B.I.M किती?? या बद्दलची माहिती असणे गरजेचे आहे. नेहमी वजन काट्यावर दिसणारं आपल वजन तंदुरुस्त्ती आणि शरीरातील चरबी दाखवणार असेलच असं नाही. योग्य वजनाचं शरीरातल्या चरबीचं, शरीराच्या आकारचं काही प्रमाण ठरवण्यात आलं आहे. त्यावरून आपणाला स्थूलपणाशी संबंधित रोगाची शक्यताही पडताळून पाहता येते. वजन कीती कमी करायचं आणि तंदुरुस्तीचा दर्जा किती आहे हे ठरवण्यासाठी खाली दिलेल्या चाचण्या उपयोगाच्या आहेत.
चला तर मग, खालील दिलेल्या
१) बॉडी मास इंडेक्स (B.M.I) ,
२). शरीरातील एकूण मेदाची टक्केवारी आणि त्याचे विभाजन ,
३) कंबरेचा घेर व
४.) कंबरेचा घेर व उंची याच प्रमाण तपासून
तुमचा B.M.I व योग्य वजन किती असावं हे शोधून काढा .
1) बॉडी मास इंडेक्स (B.M.I):- स्थूलपणा मोजण्यासाठी ही एक जागतिक मान्यता असलेली पद्धत आहे . वजन किलो मध्ये आणि उंची मीटर मध्ये घेऊन हे प्रमाण बघतात. हे प्रमाण बघितल्याने स्थूलपणाशी संबंधित संभाव्य धोक्याचा सुद्धा अंदाज करता येतो. कारण B.M.I. वाढला की टाईप-टू मधुमेह , हृदयविकार , पक्षाघात, पित्ताशयाचे विकार, हाडाचे विकार, झोपेत गुदमरणे, कॅन्सर इत्यादी अजाराचा धोकासुध्या वाढतो.
तुमचे B.M.I. मोजण्याचे सूत्र
= वजनाला उंचीच्या वर्गाने भागल म्हणजे जो आकडा येईल तो तुमचा B.M.I.
(B.M I.) = वजन (किलो मध्ये ) /उंचीचा वर्ग (मीटर मध्ये)
समजा एखादया व्यक्तीचं वजन ६६ किलो व उंची १.७ मीटर असेल तर B.M.I २२.८३ इतका असेल.
जागतिक आरोग्य संघटनेने जास्त वजन व लठ्ठपणा ठरवण्यासाठी खालील प्रमाणे निकष दिलेले आहेत.( हे निकष वय व लिंग निरपेक्ष आहेत हे लक्षात घ्यायला हवे) . B.M.I ला अर्थातच काही मर्यादा आहेत. B.M.I मुळे स्थूलपणाच रूप सांगता येत नाही , की मेद आणि स्नायु यांचं प्रमाण सांगता येत नाही. स्थुलपणाचा B.M.I दाखवलेल्या व्यक्तींमध्ये चरबी सामान्य आणि स्नायूचं प्रमाण जास्त असू शकतं.
उदा. धावपटू लठ्ठ नसतानाही त्यांचा B.M.I जास्त असू शकतो. तर स्त्रियांमध्ये त्याच्या B.M.I पेक्षा अंगावरचा मेदाचे प्रमाण जास्त असू शकते. कॉकेसीयन्स आणि काळे लोक यांच्यापेक्षा आशियातील माणसांचा B.M.I. जास्त असतो. इतर लोकांपेक्षा भारतीय किंवा आशियातील लोकांचा B.M.I पाच टक्क्यांनी जास्त असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं शरीर लहान असत व शरीरात मेद साठण्याची आनुवंशिक प्रवृत्ती असते. म्हणूनच आशिया देशात B.M.I तेवीस पेक्षा कमी असावा असे मानले जाते.
निकष-
B.M.I १८.५ कमी वजन, B.M.I १८.५ ते २४.९९ सामान्य मर्यादा .
B.M.I २५-२९.९ स्थूलपणा पूर्व अवस्था- इथे आजाराचा धोका वाढणारा आहे.
B.M.I ३०.०-३४.९९ स्थूलपणा 1- इथे आजाराचा धोका मध्यम आहे.
B.M.I ३५-३९.९९ स्थूलपणा 2 - इथे आजाराचा धोका जास्त आहे .
B.M.I ४० व जास्त - स्थूलपणा 3 -इथे आजाराचा खूप जास्त धोका .
स्थूलपणा मोजण्याची दुसरी सोपी तपासणी म्हणजे ब्रोकाचा निर्देशक हे खालील सूत्राने काढतात.
ब्रोकाचा निर्देशक = सेमिमधील उंची- १००
उदा. एखाद्या व्यक्तीची उंची -१६५ सेमी असेल तर तिचे वजन ६५ किलो पर्यंत असायला हवे.
२. शरीरातील एकूण मेदाची टक्केवारी आणि त्याचे विभाजन :-
व्यक्तीनुसार मेदाचे प्रमाण व मेद साठण्याचे अवयव हे वेगवेगळे असतात. मेदाच्या टक्केवारी पेक्षा ते मेद कोणत्या अवयवावर साठला आहे हे जास्त महत्त्वाचे असते.
उदा. एखाद्याच्या शरीरात एकूण मेदाचे प्रमाण कमी असू शकत, पण पोटावर चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. अशावेळी पोटावर वाढलेल्या मेद इतर भागातल्या मेदापेक्ष्या जास्त धोकादायक असते , कारण हे मेद लिव्हर, किडनी व आतडी यांच्याभोवती साठले जाते म्हणून या फॅटला उदरमेद किंवा व्हीसरल फॅट असं म्हणतात. तर त्वचेखाली साठणाऱ्या मेदाला सबक्युटेनि फॅट असं म्हणतात . उदरमेद आरोग्यासाठी जास्त धोकादायक असल्यामुळे, शरीरामध्ये कोणत्या भागात मेद साठलेले आहे त्यावर आपल आरोग्य अवलंबून असते . पोटावरील चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हृदयविकार आणि मधुमेह होण्याची शक्यता वाढते. हे मेदाचे सर्वसामान्य प्रमाण पुरुषांमध्ये १२-२०% व स्रियांमधे २०-२५% असले पाहिजे .
३ कंबरेचा घेर :-
पोटापासून वरच्या भागातल्या शरीराचा सर्वात बारीक भाग कंबर समजला जातो. कंबरेचा घेर मोजल्याने उदरमेचा अंदाज येतो. हे उदरमेद स्थुलपणामुळे होणाऱ्या रोगाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. वैद्यकीय दृष्ट्या भारतीय पुरुषांमध्ये ८० सेमी आणि स्त्रियांमध्ये ९० सेमी पेक्षा कमी कंबरेचा घेर असणे सामान्य आहे. कंबरेचा घेर वाजवी पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तिना टाईप टू मधुमेह, उच्चरक्तदाब , हृदयविकार, उच्च कोलेस्टेरॉल यांसारखे दीर्घकालीन व गंभीर रोग होण्याची शक्यता जास्त असते . म्हणजेच योग्य वजन असूनही कंबरेचा घेर मात्र जास्त असेल तरी रोग होण्याचा संभाव्य धोका वाढतो.
*४ कंबरेचा घेर व उंची याच प्रमाण :-
फ़क्त कंबरेचा घेर मोजण्यापेक्षा कंबरेचा घेर आणि उंची याचं प्रमाण मोजणे ही पद्धत जास्त अचूक असून ती जास्त आधुनिक आहे.
याचा हिशोब अगदी सोपा आहे. कंबरेचा घेर तुमच्या उंची पेक्षा निम्मा असायला हवा
उदा. उंची १७० सेमी असेल तर कंबरेचा घेर ८५ सेमी किंवा त्यापेक्षा कमी असायला हवा.
अशा प्रकारे तुमच्या शरीराच्या (बी एम आय). B.M.I , मेदाचे टक्केवारी, कंबरेचा घेर, उंची व कंबरेचा घेर याचे प्रमाण पडताळून घ्या, उंचीच्या प्रमाणापेक्षा तुमचे वजन जास्त असल्यास, तर त्वरितच योग्य पौष्टिक नियंत्रित आहार व नियमित व्यायाम करून , वाढत्या वजनाला आटोक्यात आणा, आणि स्वतःला फिट, निरोगी व कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज ठेवा.
कारण ,
Healthy people make, A-healthy NATION !!
Post a Comment