मुस्लिम समाज श्रीवर्धन यांच्यातर्फे कोरोना योद्धा सत्कार समारंभ आयोजित



 श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर

      संपूर्ण देशात चाललेल्या कोरोना महामारीने असंख्य नागरिकांची जीवित हानी झाली आहे. करोडो नागरिक कोरोना बाधित होऊन बरे सुद्धा होत आहेत, या कोरोना महामारीच्या लढाईत सर्व डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस मित्र, शासकीय कर्मचारी, पत्रकार आदी फ्रन्टलाइन वर काम करणारे कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी कामगिरी बजावली त्या सर्वांचे मुस्लिम समाज श्रीवर्धन यांच्यातर्फे उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे श्रीवर्धन तालुक्यातील सर्व कोरोना युद्धांचे सन्मानपत्र व मास्क देऊन गौरवण्यात आले.
     सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे यांनी कोरोना युद्धांना संबोधले. यामध्ये सफाई कामगार पासून सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिकेचे चालक, परिचारिका या सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचं कार्य कौतुकास्पद आहे. त्याचसोबत कोरोना महामारी विरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे सत्कार करून त्यांचं धैर्य व जिद्द वाढवण्याच कार्य मुस्लिम समाज श्रीवर्धन यांनी केले. या सत्कार सोहळ्याने कर्मचाऱ्यांचा मनात नक्कीच उत्साहाची भावना निर्माण होईल. असे डॉ. मधुकर ढवळे यांनी म्हटले. उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे आजूबाजूच्या तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत इथले डॉक्टर व परिचारिका उपचारांत सोबत मानसिक आधार रुग्णांना देत आहेत ही विशेष बाब आपल्या कोविड-१९ सेंटर रुग्णालयाची आहे. असे प्रतिपादन श्रीवर्धनचे नगराध्यक्ष फैजल हुजरूक यांनी केले.
      सदरच्या कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, श्रीवर्धन नगराध्यक्ष फैजल हूजरूक, मुफती अब्दुल काझी, नरुद्दीन राऊत, रशाद करदमे, डॉ. आबू राऊत, डॉ. सलीम ढालाईत, हिजायत जमादार तसेच सर्व वैद्यकीय कर्मचारी व आदी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा