जिल्हा सरासरी पर्जन्यमानाचे तीप्पट पाऊस म्हसळा तालुक्यात ; १४८४ मि.मी. पावसाची नोंद : तालुक्यातील तीन मार्ग बंद




संजय खांबेटे : म्हसळा
तब्बल १५ दिवसाचे विश्रांतीने रवीवार दि. ११ला सुरु झालेल्या धुँवाधार पावसाने तालुक्यतीतील बळीराजा सुखावला.
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 80मि.मी. पावसाची झाली नोंद झाली तर म्हसळया ला दिवसभरात २१० मि.मी.पाऊस बरसला.आजपर्यंत म्हसळ्यात एकूण १४८४ मि.मी पावसाची नोंद झाली आसल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले.आत्तापर्यंत सरासरी वार्षिक पर्जन्यमानाचे ४२% पाऊस तालुक्यात झाला आहे. आवण(रोपे) लावणीसाठी तयार असतानाआकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. आजही दिवसभर पावसाचे प्रमाण कालच्या प्रमाणेच होते. शहरालगत ची असणारी जानसई नदी सुध्दा दुथडी भरून वहात आहे.

पावसाने तालुक्यातील तीन रस्ते झाले बंद
१) दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा शहराला पर्यायी रस्ता (Bypass)
२) म्हसळा- ढोरजे- देवधर- कुडतोडी -गाय मुख रस्ता( ता.तळा )
३) आंबेत -बांगमांड ला- हरेश्वर रस्ता

म्हसळा शहरांत सखल भागात साठले पाणी
म्हसळा शहरांतील दिघी रोड,Zकॉम्लेक्स, जुने पोस्ट ऑफीस एरीया(खालचे नवा नगर ) या भागांत गटाराचे पाणी नागरी वस्तीत शिरले आणि दाणादाण ऊडवली .
दिघी पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा शहराला पर्यायी रस्त्यावरील (Bypass) अनेक भागात रस्त्यालगतचे धस कोसळ्याने रस्त्यावर MHQ चॅनलचे असीम काजी, इम्रान काजी व मित्रानी अडथळे निर्माण करून माणगाव, पुणे, मुंबई,महाडकडे जाणारी व येणारी प्रवासी वहाने प्रसंगावधान रोखून फिरवली त्या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

"पावसाचे विश्रांतीनंतर पुलावरून पाणी जात असल्याने प्रसंगावधान म्हणून वाहतुकीला बंद असलेले म्हसळा-ढोरजे- देवधर- कुडतोडी आणि आंबेत-बांगमांडला - हरेश्वर रस्ता सायं ७नंतर सुरू झाल्याचे म्हसळा अपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले."




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा