अनेक संस्था व नागरिकांकडून पूरग्रस्तांना भरगोस पद्धतीने मदतीचा हात




दि. २२ जुलै रोजी महाड चिपळूनकरंसाठी होता काळा दिवस.


 श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर


 अगोदरच कोरोणा महामारीने सामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या हतबल केले. कोरोनाचे संकट असताना पूरसदृश्य आपत्ती येणे म्हणजे पुन्हा नव्याने संसार उभा करण्यासारखे झाले. घराघरात नदी पात्राचे पाणी शिरल्याने असंख्य कुटुंबांची संसार उद्ध्वस्त झाली. कपडे, टि.व्ही., फर्निचर, बेड, अंथरूण यामध्ये चिखल गेल्याने वापरण्यास योग्य नसल्याने फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. महाड शहरात तळमजला पूर्णता पाण्याने व्यापून गेल्याने पहिल्या मजल्यावर ४ फूट पाणी होते. संपूर्ण शहर पाण्याच्या प्रवाहाखाली गेलेले. चार चाकी व मोटरसायकली अस्ताव्यस्त अवस्थेत आहेत. सर्वत्र भूक व पाण्याविना माणसे सैरावैरा गाड्यां मागे धावत आहेत. परंतु मदतीचा ओघ अजून थांबलेला नाही मोठमोठे ट्रक टेम्पो भरुण अन्नधान्य, कपडे, पाणी बॉटल, मेणबत्ती यांचे वाटप चालू आहे. डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या संकटाला जातीपातीचा विचार न करता सर्वधर्म समभाव व माणुसकी या नात्याने मदतीचा हात पुढे जात आहे.




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा