महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति शाखा म्हसळा आणि एन एस एस विभाग वसंतराव नाईक आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 24 जुलै रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बेंद्रे, महा अनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे, जिल्हा पदाधिकारी नेताजी गायकवाड, म्हासळा शाखा अध्यक्ष सै.नवाज नजिर, कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर , प्रधान सचिव रुपेश गमरे, व इतर सर्व कार्यकर्ते , विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
वृक्षारोपणानंतर आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे सर यांनी अंनिस आणि एन एस एस एकमेकास कसे पूरक आहेत हे सांगत असतानाच अंनिसने राज्याला दोन महत्त्वाचे कायदे करण्यास भाग पाडले व त्यासाठी आपल्या शीर्ष नेतृत्वाचे बलिदान सहन केले याची जाणीव करून दिली . तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महा आणि च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मदत कार्याची माहिती दिली. प्राचार्य जाधव सर यांनी आपल्या मनोगतात अनिस चे कार्य युवकांना सोबत घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे असे गौरवोद्गार काढले . अध्यक्ष समारोप करताना म्हसळा शाखा अध्यक्ष सय्यद नवाज नजीर यांनी भविष्यात गावपातळीवर जाऊन आपल्याला समाजाचे अधिक प्रबोधन करण्याची गरज आहे असा विचार मांडला.
एन एस. एस. कार्यक्रम अधिकारी व महा. अंनिस पत्रिका चे जिल्हा कार्यवाह प्रा. डॉ. संजय बेंद्रे यांनी एन.एस.एस. व अंनिस याचा विवेकी युवक निर्माती मधील योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसळा शाखा कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर यांनी अगदी मोजक्या व यथार्थ शब्दात केले .तर आपल्या आभार सूत्रसंचालनाने प्रधान सचिव रुपेश गमरे यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला . यावेळी महिला विभाग कार्यवाह ऋतिका काकडे व युवा विभाग कार्यवाह सिद्धांत शिंदे यांनी ,' हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे , या गीताद्वारे माणुसकीला साद घातली. शेवटी शाखा उपाध्यक्ष प्रा. भोसले सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले..
सदर कार्यक्रमासाठी वसंतराव नाईक कालेज चे चेअरमन फजल हलदे साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्या . सदर कार्यक्रमाला अंनिस कार्यकर्ते व सरपंच चंद्रकांत पवार. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक.प्रा. समेल सर, प्रा. सिध्दीकी सर , प्रा. टेकले सर , प्रा. सुमित चव्हाण , साळवे सर , नजिर मॅडम पीएनपी पाष्टी हायस्कूलचे शिक्षक प्रफुल्ल पाटील , ललित पाटील, बिलाल शिकलगार तसेच तोराडी येथील कार्यकर्ते सुजल करावडे सुदेश कुले भापट चे मनोहर मोहिते, ताम्हणे करंबे चे आर्यन येलवे व इतर अनेक युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला व लवकरच म्हसळा शाखेच्यावतीने पूरग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन म्हसळा शाखेच्यावतीने कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांनी व्यक्त केला .
Post a Comment