- कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी छोटस प्रयत्न..
आज दिनांक १ जुलै २०२१ रोजी कृषीदिनानिमित्त वेळास गावातील शेतकऱ्यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले व शेतीसाठी लागणारे काही वस्तु वाटप करण्यात आल्या. शेतीकड़े शेतकऱ्यांचे पाऊल पुन्हा वळावे यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न.
या कार्यकमाला गाव अध्यक्ष श्री संदीप दिवेकर, दळवी वाड़ी अध्यक्ष श्री सचिन दळवी, गांव सेक्रेटरी श्री प्रकाश दिवेकर, मुंबई कमिटी अध्यक्ष श्री दिपक दरगे, गांव खजिंदार श्री दिपक वाजे,स्वराज घोले, भीकु दिवेकर,व सर्व शेतकरी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामासाठी श्री मंगेश जामदार,श्री किरण भंडारी यांनी सुद्धा सहकार्य केले आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद व भारती धनावड़े यांनी माफक दरात वस्तु दिल्या बद्दल त्यांनाही धन्यवाद देत धवल तवसाळकर यांनी आभार व्यक्त केले.
Post a Comment