रायगड जिल्हा परिषदमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन


टीम म्हसळा लाईव्ह

माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषद मध्ये अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कु.योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य श्री.आस्वाद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. बबन मनवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले तसेच कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले व इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

कृषी दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभाग योजना माहिती पत्रकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. जयवंत गायकवाड यांनी वृक्ष प्रतिज्ञा दिली. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे एक लाख झाडे लावण्यात आली असून लवकरच एक लक्ष साठ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्टपूर्ती करण्याचे नियोजन आहे.

कुंटेबाग येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कु.योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, माजी उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य श्री.आस्वाद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. बबन मनवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.ज्ञानदा फणसे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी श्री. उत्तम जाधव, अलिबाग गट विकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख, राजेश घरत, डॉ. कैलाश चौलकर व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा