कोकण पूरग्रस्त मदत निधी संकलन



कोकण भूमी प्रतिष्ठान. !  कोकण बिझनेस फोरम !

कोकण हायवे समन्वय समिती ! समृद्ध कोकण संघटना


कधी नव्हे इतका महाप्रलय कोकणात आला आहे. विशेषता चिपळूण शहराची परिस्थिती काल भयानक होती.

खेड महाड राजापूर सर्व बाजारपेठा उध्वस्त झाल्यात. अनेक घर संपूर्ण  पाण्याखाली गेली. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कोकणातील हजारो कुटुंबे अतिशय अडचणीत आहेत.

चक्रीवादळात किनारपट्टी उद्ध्वस्त झाली आत्ता बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या. उद्योग-व्यवसाय प्रगतीच्या दृष्टीने कोकण किमान दहा वर्षे मागे गेला. पर्यावरण ,जंगल तोड ,ग्लोबल वार्मिंग, शासकीय यंत्रणांचा ढिसाळपणा, डिझास्टर मॅनेजमेंट नावाची गोष्टच कोकणात अस्तित्वात नसणे. अशा अनेक गोष्टींची चर्चा आपल्याला करता येईल. पण याकरता वेळ आहे.  आज या सर्व चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या बांधवांच्या मदतीसाठी आपले लक्ष केंद्रित करूया.


      पश्चिम महाराष्ट्रात पूर आला किँवा  मराठवाड्यात भूकंप झाला तर मदत कार्यात सर्वात पुढे कोकणातले तरुण आणि कोकणवासी असतात. आज अशीच मदत संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून कोकणात अपेक्षित आहे.


       मुंबईत आणि पुण्यात दहा हजारहून अधिक कोकणस्थ ग्रामस्थ मंडळे आणि सामाजिक संस्था आहेत. प्रत्येक संस्थेने आपल्याला जे जमेल ते केले पाहिजे. कोकणातील अनेक कोळी बांधव आपल्या गावातून बोटी घेऊन मदतीसाठी आले.

कोकण नेहमीच स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होता आणि आहे.  रत्नदुर्ग माउंटेनर्स ,राजू काकडे अकॅडमी  , रत्नागिरी संगमेश्वर दापोली मालवण पूर्ण कोकणातून अशा अनेक संस्था जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी कालपासून झटत आहेत . त्या त्या ठिकाणचे राजकीय कार्यकर्ते , नेते आणि शासकीय यंत्रणा आणि अधिकारी सुद्धा आपल्या परीने प्रचंड परिश्रम घेत आहेत. जे जे काम करत आहेत त्यांचे मनापासून आभार.


        कोकण भूमी प्रतिष्ठान, समृद्ध कोकण संघटना,

 कोकण बिझनेस फोरम आणि कोकण हायवे समन्वय समिती आपल्या विविध शाखांच्या माध्यमातून आपण आपल्या बांधवा करता तातडीची मदत गोळा करायचे ठरवले आहे.

या पुरग्रस्तांना लागणारे तातडीचे अन्नपदार्थ म्हणाजे धान्य,, 

स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, आणि पाण्याचे बॉक्सेस ही तातडीची मदत वस्तू रूपाने किंवा या वस्तू खरेदी करण्याकरता निधी आपण पुढील दोन दिवस मदत निधी  आणि वस्तू रूपाने मदत जमा करित  आहोत. व आपली कार्यकर्त्यांची टीम युयुतसू  अर्ते , कौस्तुभ सावंत. ही टीम अगोदरच येथे काम सुरू केले आहे  यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गरजूंना हे साहित्य आपण वितरीत करणार आहोत.


      ज्यांना वस्तू रूपाने मदत करायची आहे, यांनी धान्य आणि स्वच्छता साहित्य पॅकेज आणि पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्सेस खालील ठिकाणी जमा करावेत. त्यांना प्रत्यक्ष मदत करायचे त्यांनी खालील दूरध्वनी वर संपर्क साधावा.


मदती साठी लागणारे साहित्य(किट)

   *टूथ ब्रश,४, टूथपेस्ट,साबण कपड्याचा/अंघोळीचा,पॅकिंग पिशव्या,गार्बेज बँग,सॅनिटरी पॅड,टॉवेल,चादर,मच्छर अगरबत्ती,मेणबत्ती,माचिस सुकाखाऊ,(बिस्किट फरसाण  वगैरे)युज अँड थ्रो डिश,,ORS, 

डाळ, तुर मुग चणा. अर्धा अर्धा किलो पाकीट

तांदूळ(तीन किलो,) फरसाण ,बिस्किटे मीठ, तेल, तिखट,गहू/तांदूळ पिठ (दोन किलो )  दूध पावडर  ,याचा एकत्रित बॉक्स बनवावा. या शिवाय पाण्याचे बॉक्स सुद्धा स्वीकारले जातील.

शिवाय स्वच्छतेसाठी फिनेल च्या बाटल्या आवश्यक आहेत.


आर्थिक सहाय्य देखील स्वीकारलं जाईल.*🤝


प्रत्येक देणगीदारांनी या वस्तूंचे पॅकेज बनवावे. व आपल्याला शक्य असतील तितकी पॅकेज  खालील पत्त्यावर आणून जमा करावेत.


     सचिन +91 90825 50774.

शॉप नंबर 25 अजय शॉपिंग   सेंटर ,टी एच कटारिया मार्ग संदेश मिठाई जवळ ,माटुंगा स्टेशन वेस्ट.


केदार सुरेश पाध्ये,  9769121077

ट्रिनेट  कम्युनिकेशन, ५, गोपाळ स्मृती साईलीला, प्लॉट नंबर 52 रेल्वे कॉलनी, शिवम हॉस्पिटल जवळ डोंबिवली एमआयडीसी रोड,  घर्डा सर्कल जवळ डोंबिवली पूर्व


दीपक दळवी.   9820440821

A/४.   न्यू कृष्ण कुटीर पटवर्धन वाडा जोशी वाड्यासमोर चरई ठाणे पश्चिम


  संतोष पंडित.  +91 99203 67572.   बोरीवली


संजय  यादवराव

अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा