म्हसळा -प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक प्रादेशिक कार्यालय जव्हार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय रायगड,पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अनुसुचित जमाती मधील कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी खावटी योजने अंतर्गत अन्नधान्य वस्तुचे किट पालकमंत्री आदिती तटकरे यांचे शुभ हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी त्यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,सभापती छायाताई म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,प.स.सदस्य मधुकर गायकर,माजी सभापती उज्वला सावंत,प्रादेशिक व्यवस्थापक दिपक अंबावडे,प्रकल्प अधिकारी शशिकला आहिराव,क्रीडा उपसंचालक संजय महाडीक,प्रांतअधिकारी अमित शेटगे,निना.तहसीलदार के.टी.भिंगारे,जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर,तालुका क्रीडा अधिकारी संदीप वांजळे,उपकार्यकारी अभियंता गणगणे,जेष्ठ नेते अंकुश खडस आदी मान्यवर उपस्थित होते.आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत योजनेचा शुभारंभ
म्हसळा,श्रीवर्धन आणि तळा या तीन तालुक्यातील आदिवासी कुटुंबाना खावटी वाटप करून करण्यात आला.कोरोना प्रादुर्भाव कालावधीत आदिवासी कुटुंबाचा उपजीविकेचा साधन व रोजगार बंद पडल्याने त्यांना वेळीच मदत व्हावी यासाठी शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत जिल्ह्यातील सर्वच कुटूंबाना खावटी वाटप करण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिराव यांनी प्रास्तविक करताना सांगितले.खावटी वाटप योजनेचा शुभारंभ म्हसळा,श्रीवर्धन आणि तळा तालुक्यातील प्रत्येकी 10 असे मिळून 30 आदिवासी कुटुंबाना करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालयाकडे सुमारे 34 हजार अन्नधान्य किट उपलब्ध झाले आसुन खावटी योजनेच्या निवासी व स्थलांतरित प्रत्येक कुटुंबातील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यातील निवासी कुटुंबातील 29 हजारहुन अधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे तर 5 हजार हुन अधिक लाभार्थी स्थलांतरित असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदिवासी पाड्यात आदिवासी कुटुंबाला त्या त्या पाड्यातील शाळा शिक्षका करवी अन्नधान्य किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रकल अधिकारी शशिकला आहिराव यांनी उपस्थिताना माहिती देताना सांगितले.
Post a Comment